रसात्विक राजगिरा उपमा (satvik rajgira upma recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#ngnr श्रावण महीना सणवार भरपुव तसेच उपवास ही चालुच असतात. तेंव्हा रोज ब्रेकफास्ट ला काय करायचे प्रश्नच असतो,तेंव्हा हा पदार्थ सर्वां साठी खुप उपयोगी आहे , राजगिरा असल्यामुळे थोडासा खाल्ला तरी पोट भरल्या सारखे वाटते. व हेल्दी डाएट आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
२ लोक
  1. 1कप राजगिरा पीठ
  2. 1बटाटा (कच्चा)
  3. 1टेबलस्पून हीरवी मीरची
  4. 2टेबलस्पून डाळिंबाचे दाणे
  5. 2टेबलस्पून पेअर च्या फोडी
  6. 2टेबलस्पून शेंगदाणे
  7. 1/2लिंबु
  8. 1टेबलस्पून शेगदाणा तेल
  9. 1टेबलस्पून ओल खोबर
  10. चवीपुरते मीठ
  11. 1/4टेबलस्पून साखर
  12. कोथिंबीर

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    प्रथम राजगिरा पीठ १/२ टे. स्पुन तेल घालुन भाजुन घ्यावे.. बटाट साल काढून पातळ फोडी करुन घ्याव्यात. १ कप पाणि एका भांड्यात गरम करुन ठेवावे.

  2. 2

    एका पॅन मधे तेल घालुन जीरे घालावे, जीरे तडकडल्या नंतर मीरची घालावी., नंतर बटाटा फ्राय करुन घ्यावा व नंतर पाउल कप गरम पाणि घालावे व मीठ घालावे नंतर पीठ घालुन चांगले मीक्स करावे. गरज वाटल्यास अजुन थोडे गरम पाणि घालावे. साखर व लिंबाचा रस घालावा. व झाकन ठेवावे व एक वाफ काढावी. गॅस बंद करावा. एका प्लेट मधे घालुन वर पेअर च्या फोडी व डाळिंबाचे दाणे घालावे व ओल खोबर ही घालावे. व कोथिंबीर घालुन सर्व्ह करावा राजगिरा उपमा.

  3. 3

    उपवासालाही चालेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या (3)

Similar Recipes