इडली सांबार चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#HLR #हेल्थी रेसिपी चॅलेंज हेल्दी ब्रेकफास्ट साठी इडली सांबार चटणी पोटभरीचा नाष्टा संपुर्ण दिवस उत्साही करणारा

इडली सांबार चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)

#HLR #हेल्थी रेसिपी चॅलेंज हेल्दी ब्रेकफास्ट साठी इडली सांबार चटणी पोटभरीचा नाष्टा संपुर्ण दिवस उत्साही करणारा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१  १/२ तास
४-५ जणांसाठी
  1. ४० ग्रॅम तुरडाळ
  2. २० ग्रॅम मसुरडाळ
  3. 1 टीस्पूनमेथीदाणे
  4. 1/4 टीस्पूनहळद
  5. 1कांदा
  6. 1टोमॅटो
  7. 2वांगी
  8. 2तोंडली
  9. 2-3शेवग्या शेंगा
  10. २० ग्रॅम लाल भोपळा
  11. 2-3लाल मिरच्या
  12. 5-6कडिपत्याची पाने
  13. 1 टीस्पूनमोहरी
  14. 1 पिंचहिंग
  15. 1 टीस्पूनकाश्मिरी तिखट
  16. 1-2 टेबलस्पुनसांबार मसाला
  17. 2-3 टेबलस्पुनचिंचेचा कोळ
  18. 3 टेबलस्पुनगुळ
  19. 2-3 टेबलस्पुनखोवलेले ओले खोबर
  20. 2 टीस्पूनकोथिंबिर
  21. चटणी साठी
  22. ३० ग्रॅम कोथिंबीर
  23. २० ओलेखोबरे
  24. 10 ग्रॅमडाळे
  25. 3-4मिरच्या
  26. 1 टीस्पूनसाखर
  27. ३०० ग्रॅम इडलीपिठ
  28. चविनुसारमीठ
  29. 1 टेबलस्पुनतेल
  30. 1/4 टीस्पूनबेकिंगसोडा

कुकिंग सूचना

१  १/२ तास
  1. 1

    इटलीच्या पिठात मीठ, तेल, सोडा मिक्स करून फेटुन लगेच इडली स्टॉंड मध्ये बॅटर भरून १०-१२ मिनिटे वाफवुन इडल्या करून घ्या

  2. 2

    दोन्ही डाळी व मेथी दाणे स्वच्छ धुवुन १/२ तास भिजवुन ठेवा नंतर त्यात हळद मिक्स करून लहान कुकरमध्ये २-३ शिट्टया काढुन डाळ शिजवुन घ्या सर्व भाज्या, टोमॅटो बारीक चिरून ठेवा कांदा उभा पातळ चिरून घ्या

  3. 3

    पातेल्यात तेल गरम झाल्यावर मोहरी, हिंग, कडिपत्ता, लाल मिरच्या परतुन घ्या नंतर त्यात उभा चिरलेला कांदा टाकुन परतुन शिजवा त्यातच नंतर हळद, काश्मिरी तिखट, सांबार मसाला मिक्स करून परता त्यात टोमॅटो व सर्व भाज्या मिक्स करून २-३ मिनिटे परता नंतर त्यात गरम पाणी व मीठ टाकुन भाज्या झाकण ठेवुन शिजवा

  4. 4

    आवश्यकते नुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता सांबार शिजवतानाच त्यात चिंचेचा कोळ, गुळ तसेच ओल खोबर, कोथिंबिर मिक्स करा

  5. 5

    चटणीचे सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये भरून थोड पाणी मिक्स करून चटणी वाटुन ठेवा

  6. 6

    गरमगरम वाफाळती इडली, सांबार, चटणी प्लेटमध्ये सजवुन सर्व्ह करा सांबारावर वरून कोथिंबिर टाका

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या (4)

Similar Recipes