इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#cr इडली-सांबार म्हटले की लगेच दक्षिणात्य लोकांची डिश म्हणून प्रसिद्ध.. जरी ती दक्षिणात्य असली तरी आम्हा मुबंईकरांना आपलीशीच वाटते. तर मग करून बघूया 'इडली - सांबार '

इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi)

#cr इडली-सांबार म्हटले की लगेच दक्षिणात्य लोकांची डिश म्हणून प्रसिद्ध.. जरी ती दक्षिणात्य असली तरी आम्हा मुबंईकरांना आपलीशीच वाटते. तर मग करून बघूया 'इडली - सांबार '

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 minite
5 ते 6 सर्व्हिंग्ज
  1. 2वाटया उकडा तांदूळ
  2. 1/2 वाटीउडीद डाळ
  3. मीठ,
  4. 1/2 टीस्पून खायचा सोडा
  5. सांबर साहित्य
  6. 3/4 वाटीतूरडाळ
  7. 1कांदा,
  8. 1 टोमॅटो
  9. 1लहानसा लाल भोपळ्याचा तुकडा,
  10. 1 वांगे,
  11. 1 शेवग्याची शेंग
  12. खोबऱ्याचा लहान तुकडा,
  13. 1 टेबलस्पून तिखट,
  14. मीठ,
  15. चिंच,
  16. 5-7 थोडा कढीपत्ता,
  17. 2 टेबलस्पून सांबार मसाला,
  18. थोडा गूळ
  19. सांबार मसाला
  20. 2 टेबलस्पूनtbs धने,
  21. प्रत्येकी
  22. 1 टीस्पून जीरे ,
  23. उडीद डाळ,
  24. 1 टेबलस्पूनचणाडाळ,
  25. 1 लहान खोबऱ्याचा तुकडा,
  26. 2 लवंग,
  27. 1 लहान दालचिनीचा तुकडा,
  28. त्येकी
  29. 4-5 काळीमिरी व मेथीदाणे,
  30. सर्व साहित्य भाजून त्याची पूड करावी

कुकिंग सूचना

45 minite
  1. 1

    तांदूळ व उडीद डाळ आदल्या दिवशी वेगवेगळे भिजत घालावे. 6-7 तास भिजल्यावर मिक्सरवर वेगवेगळे वाटून घ्यावे. नंतर दोन्ही एकत्र करून त्यात मीठ घालून, चांगले कालवून, मोठया भांड्यात ठेवावे. सकाळपर्यंत चांगले फुगून येईल.

  2. 2

    दुसऱ्या दिवशी सकाळी इडलीच्या बॅटरमध्ये सोडा घालून पीठ कालवावे. इडली पात्राला तेल लावून त्यात इडलीचे बॅटर 1/1 चमचा घालावे. व इडलीच्या भांड्यात 10- 15 मिनिटे वाफवून घ्यावेत. इडली पात्र थंड झाल्यावरच इडल्या चमच्याने काढाव्यात.

  3. 3

    तुरीची डाळ शिजवून घ्यावी. सर्व भाज्या स्वच्छ धुऊन चिरून घ्याव्यात, कांदा - टोमॅटो चिरून घ्यावा, चिंच भिजत घालून कोळ करावा.पातेल्यात तेल गरम करून त्यात कढीपत्ता, हिंग, मोहरी ची फोडणी करावी. त्यानंतर कांदा टोमॅटो परतावा, सर्व भाज्या घालाव्यात. मीठ, तिखट, सांबार मसाला घालावा व सर्व परतावे. भाज्या मऊ झाल्यावर शिजवून घेतलेली तूरडाळ, चिंचेचा कोळ, गूळ घालावा. चांगले शिजू द्यावे. सांबार दाटसर असावे.

  4. 4

    डिशमध्ये गरम गरम इडलीवर सांबार घालून सर्व्ह करावे. 🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या

Similar Recipes