इडली सांबार (idli sambhar recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#cr
#कॉम्बो कॉन्टेस्ट
# इडली सांबार

इडली सांबार (idli sambhar recipe in marathi)

#cr
#कॉम्बो कॉन्टेस्ट
# इडली सांबार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35-40 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. 1+ 1/2 कप साधा तांदूळ
  2. 1+ 1/2 कप इडली रवा
  3. 1 कपउडीद डाळ
  4. 1 टीस्पूनमेथी दाणे
  5. 1/4 कपपोहे
  6. चवीनुसारमीठ
  7. आवशक्तेनुसार पाणी
  8. सांबार साहित्य..
  9. 2कांदे
  10. 3टोमॅटो
  11. 1बटाटा
  12. 10-12 तुकडेशेवगा
  13. 1/2 कपदुधी भोपळा
  14. कढीपत्ता पाने
  15. 1 टीस्पूनमोहरी
  16. 1 टीस्पूनजीरे
  17. 1/2 टीस्पूनhing
  18. 2/3 कपतूरडाळ
  19. 1 टीस्पूनहळद
  20. 1 टेबलस्पूनसांबार मसाला (आवडीनुसार कमी जास्त करणे)
  21. 1 टेबलस्पूनलाल तिखट (आवडीनुसार कमी जास्त करणे)
  22. 2 टेबलस्पूनतेल
  23. 1/2 टीस्पूनमेथी दाणे
  24. 2-3चिंच तुकडे
  25. चवीनुसारमीठ
  26. आवाशक्तेनुसार पाणी
  27. कोथिंबीर

कुकिंग सूचना

35-40 मिनिट
  1. 1

    प्रथम उडीद डाळ, साधा तांदूळ, इडली रवा 5-6 तास भिजत घालणे. उडीद डाळ मध्ये मेथी दाणे आणि पोहे घालून भिजवणे. आता हे सगळे मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणे. व रात्रभर हे बॅटर फेरमेंट करण्यासाठी ठेवणे. सकाळी छान फुगून वर येते.आता इडली पीठ तयार आहे.

  2. 2

    सांबार करण्यासाठी.... प्रथम आवडीनुसार भाज्या चिरून घेणे. कांदा, टोमॅटो, भोपळा, शेवगा चिरून घेणे. आता कुकर डबा मध्ये तूरडाळ घेऊन ती 2-3 वेळा स्वच्छ धून घेणे. त्या मध्ये कांदा, टोमॅटो, बटाटा हे घालून हे सगळे कुकर मध्ये छान शिजवून घेणे. त्या मध्ये हळद, हिंग घालणे.10 मिनिट शिजून घेणे.

  3. 3

    या मध्ये भोपळा, शेवगा वेगळे 3-4 मिनिट मीठ घालून वाफवणे. आता डाळीत सगळे भाज्या घालून डाळ शिजवून घेणे.आता शिजलेली डाळ छान हाटून घेणे.

  4. 4

    आता गॅस वर पातेले ठेवून त्या मध्ये तेल घालावे. तेल गरम झाले कि त्या मध्ये मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता, मेथी दाणे याची फोडणी करून घेणे. आता या मध्ये भाज्या घालून शिजलेली डाळ घालावी. लागेल तसे गरम पाणी घालावे. आता या मध्ये लाल तिखट, सांबार मसाला, चिंच, चवीनुसार मीठ घालावे.

  5. 5

    आता या मध्ये शिजवून घेतलेले शेवगा, भोपळा घालून घेणे. सांबार छान 5-7 मिनिटे उकळून घेणे. भाज्यांचा स्वाद त्या मध्ये उतरतो. मस्त टेस्टी असे सांबार तयार होते. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

  6. 6

    आता इडली करण्यासाठी तयार पिठामध्ये चवीनुसार मीठ घालावे. इडली प्लेट ला तेल लावून घेणे व त्या मध्ये पीठ घालून या प्लेट इडली पात्रात ठेवून देणे. झाकण ठेवून 15 मिनिट वाफवून घेणे. मस्त स्पॉनजि इडली तयार होतात.

  7. 7

    अशा प्रकारे लागेल तसे इडली करून घेणे.इडली झाली कि त्याची वाफ गेली कि पात्रातून इडली काढून घेणे. व बाउल मध्ये सुती कापड ठेवून त्या मध्ये इडली ठेवावीत. म्हणजे इडली भिजट होत नाही.

  8. 8

    अशा प्रकारे इडली, सांबार दोनीही तयार आहे. गरम गरम इडली सांबार सर्व्ह करावे. खूप मस्त पोटभरीचा आणि आवडीचा मेनू तयार होतो.

  9. 9
  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes