भरली वांगी विथ ग्रेव्ही (bharli vangi with gravy recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#EB2
#W2
भारतीय जेवणातील विविध मसाले आणि प्रत्येकाची करण्याची पद्धत, ही त्या खाद्यपदार्थाची रुची वाढवतात...
असे बघा भरली वांगी रेसिपी जवळजवळ सर्रास सर्वी इकडेच बनवली जाते. पण त्यांची प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते. मी जेव्हा जेव्हा ही भाजी करते मी सुद्धा यात नेहमी वेगवेगळे मसाले घालून नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करत असते. कोणी जर मला विचारले की भरली वांगी तू कसे करते तेव्हा प्रश्न पडतो यांना नेमकी कोणती पद्धत आपण सांगावी...
म्हणजे बघा ना आपल्या कोकणात भरल्या वांग्यात शेंगदाण्याचा कूट, कांदा खोबऱ्याचे कोथिंबीरीचे वाटण, आणि कोकणी किंवा मालवणी मसाला घातला जातो. पुण्या साईडला ब्राम्हणी पद्धतीच्या भरल्या वांग्यात कांदा लसूण याचा वापर केला जात नाही. पण मात्र गोडा मसाला आणि चिंच गुळाचा वापर हमखास केला जातो.. आणि उत्तर महाराष्ट्राची बातच निराळी.. पांढरे तीळ, खसखस, शेंगदाणे याचा वाटणात समावेश करून त्याला अगदी झणझणीत बनवले जाते... असो
मी मात्र आज तुम्हाला विदर्भ स्टाइल भरली वांगी विथ ग्रेव्ही ही कशी करायची ते सांगणार आहे. चला तर मग करायची.. 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनीट
४ लोक
  1. 5-6काटेरी जांभळ्या रंगाची वांगी
  2. 3-4 टेबलस्पूनखोबराकिस
  3. 2 टेबलस्पूनतिळ
  4. 1/4 कपभाजलेले शेंगदाणे
  5. 1/2 टेबलस्पूनजीरे
  6. 7-8कढीपत्ताची पाने
  7. 1कांदा बारीक चिरलेला
  8. 1छोटे टमाटर कापलेले
  9. 5-6लसूण पाकळ्या
  10. 1/2 इंचअदरक चा तूकडा
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 2-3 टेबलस्पूनतिखट
  13. 2 टेबलस्पूनकश्मीरी लाल तिखट (रंग येण्यासाठी)
  14. 1 टेबलस्पूनगोंडा मसाला
  15. 1 टेबलस्पूनकाळा मसाला
  16. 1/4 टीस्पूनहिंग
  17. 1 टेबलस्पूनबेसन
  18. 1/4 कपशेंगदाणे तेल ( आवडीनुसार कुठल्याही तेलाचा वापर करू शकता
  19. 2-3 टेबलस्पूनमसाल्यात घालण्यासाठी तेल
  20. मीठ चवीनुसार
  21. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

३०मिनीट
  1. 1

    सर्वप्रथम वांग्या मध्ये भरण्यासाठी लागणाऱ्या मसाल्याचे साहित्य तयार करून घेऊया...
    त्यासाठी पॅनमध्ये शेंगदाणे घालावे व शेंगदाणे चांगले भाजून घ्यावेत. नंतर ते प्लेटमध्ये काढून त्याची साले काढून घ्यावी. आता त्याच पॅनमध्ये खोबरा कीस, तीळ हे देखील खरपूस भाजून घ्यावे. त्यातच अद्रक लसूण घालावे व एक दोन मिनिटे परतून घेतल्यानंतर त्यातच कोथिंबीर घालावी व एक मिनिटे परतून घेऊन गॅस बंद करावा. व मसाला थंड करायला ठेवावा.

  2. 2

    थंड केलेल्या मिश्रणामध्ये शेंगदाणे घालावे.व मिक्सर मधून बारीक वाटण तयार करून घ्यावे.

  3. 3

    आता या बारीक केलेल्या मिश्रणात बाकीचे सुके जिन्नस घालावे..
    जसे तिखट, धनेपावडर, जिरापावडर, हिंग, गोंडा मसाला, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद, बेसन घालून चांगले मिक्स करून घ्यावे. नंतर त्यामध्ये २-३ टेबलस्पून तेल घालून परत एकदा चांगले मिक्स करावे.

  4. 4

    वांगी कापतांना प्लस साईज देऊन वांगी कापावी. खालचे देट कापल्या जाणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि कापल्यानंतर वांगे किडक आहे की नाही हे सुद्धा बघून घ्यावे. त्यानंतर वांग्याला थोडे मीठ चोळून घ्यावे. (मीठ चोळून घेतल्याने वांग्याला टेस्ट छान येते.) नंतर त्यामध्ये केलेला मसाला चारी बाजूंनी दाबून दाबून भरून घ्यावा. मसाला भरताना वांग्याचे तुकडे होणार नाही याची काळजी घ्यावी. बाकी राहीलेला मसाला तसाच ठेवावा.

  5. 5

    आता पॅनमध्ये तेल घालावे. तेल गरम झाले की मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता घालावा व उरलेला जो मसाला आहे तो मसाला तेलात घालुन चांगला परतुन घ्यावा. आवश्यकतेनुसार किंचित पाणी घालावे. थोडा मसाला परतून घेतला की त्यामध्ये भरलेली वांगी घालावी व झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे ही वांगी होऊ द्यावी. नंतर हलक्या हाताने वांग्याची बाजू पलटवून परत झाकण ठेवून, दोन-तीन मिनिटे होऊ द्यावे. किंचीत परत पाणी घालून झाकण ठेवून वांगी शिजू द्यावी.

  6. 6

    वांगी 70% शिजली की, त्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालावे व परत झाकण ठेवून शिजू द्यावी. चवीनुसार मीठ घालावे. (मीठ घालताना थोडे बेतानेच घालावे. कारण मसाल्यामध्ये देखील आपण मीठ घातलेले आहे)

  7. 7

    भाजीला उकळी आली की, त्यामध्ये कोथिंबीर घालावी. गरम मसाला घालावा व गरमागरम *भरली वांगी विथ ग्रेव्ही* चपाती सोबत, वाफाळलेल्या भातासोबत, भाकरी सोबत सर्व्ह करावी.. 💃 💕

  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes