भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#डिनर वांग्यांचा कोणताही प्रकार आपल्याला आवडतोच आज मी सगळ्यांसाठी झणझणीत अशी भरली वांगी केली आहे कशी केलीत विचारता? चला तर बघुया

भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)

#डिनर वांग्यांचा कोणताही प्रकार आपल्याला आवडतोच आज मी सगळ्यांसाठी झणझणीत अशी भरली वांगी केली आहे कशी केलीत विचारता? चला तर बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-४ जणांसाठी
  1. 1 टेबलस्पुनबारीक चिरलेली कोथिंबिर
  2. 1-2 टीस्पूनकिसलेला गुळ
  3. 4-5काटेरी वांगी
  4. ३० ग्रॅम भाजलेल्या कांदा खोबर आललसुण तिळ खडा मसाला कोथिंबिरीचे वाटण
  5. ८-१० कडिपत्याची पाने
  6. 1 टीस्पूनमोहरी
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. चविनुसारमीठ
  9. 1-2 टेबलस्पुनतेल
  10. 2-3 टेबलस्पुनभाजलेल्या शेंगदाण्याचा कुट
  11. 1/4 टीस्पून हळद
  12. 2 टीस्पूनतिखट
  13. 1-2 टेबलस्पुनकोल्हापुरी कांदा लसुण मसाला

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    भरली वांगी करण्यासाठी लागणारे साहित्य डिशमध्ये काढुन ठेवा

  2. 2

    सर्व मसाल्याचे साहित्य त्यात मीठ मिक्स करून एकत्र करा वांग्यांना उभ्या आडव्या अर्धवट चिरा देऊन त्यात तयार केलेला मसाला भरा

  3. 3

    पातेल्यात तेल गरम केल्यावर जीरे मोहरी हिंग कडिपत्ता टाकुन परता व मसाला भरलेली वांगी सोडून१-२ मिनिटे हळुवार परतुन घ्या नंतर उरलेला मसाला टाकुन परता

  4. 4

    नंतर त्यात आवश्यक तेवढे गरम पाणी ओतुन मंद गॅसवर झाकण ठेवुन शिजवा

  5. 5

    आपली भरली वांगी रस्सा खाण्यासाठी रेडी

  6. 6

    झणझणीत गरमगरम भरली वांगी काचेच्या बाऊलमध्ये सर्व्ह करा वरून कोथिंबिर ठेवुन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes