इंन्संन्ट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#EB3 #W3
आजकाल वाढदिवसाच्या पार्टीत किंवा आपल्या किटी पार्टीत अगदी सहज समाविष्ट होणारा पदार्थ म्हणजे ढोकळा,कारण हा करायलाही सोपा आणा पचायलाही हलका. मस्त फुगलेला,जाळीदार ढोकळा वरून खमंग चुरचुरीत तीळाची फोडणी अहाहा 😋😋 अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडीचा खमण.आज मी केलाय Instant ढोकळा.अगदी 15-20 मिनिटात तयार.

इंन्संन्ट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)

#EB3 #W3
आजकाल वाढदिवसाच्या पार्टीत किंवा आपल्या किटी पार्टीत अगदी सहज समाविष्ट होणारा पदार्थ म्हणजे ढोकळा,कारण हा करायलाही सोपा आणा पचायलाही हलका. मस्त फुगलेला,जाळीदार ढोकळा वरून खमंग चुरचुरीत तीळाची फोडणी अहाहा 😋😋 अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडीचा खमण.आज मी केलाय Instant ढोकळा.अगदी 15-20 मिनिटात तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमबाॅम्बे बेसन (हे बेसन अगदी बारिक दळलेले असते)
  2. 1/4 कपदही
  3. 1 टीस्पूनलिंबारा रस
  4. 1 टेबलस्पूनसाखर
  5. मीठ चवीनुसार
  6. 1 टेबलस्पूनआल मिरची पेस्ट
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. 2 टेबलस्पूनफ्रुट साॅल्ट किंवा इनो
  10. 200 मिलीलीटरपाणी
  11. फोडणीसाठी
  12. 4 टेबलस्पूनतेल
  13. 1/2 टीस्पूनमोहरी
  14. 1/4 टीस्पूनजीरे
  15. 1/2 टीस्पूनतीळ
  16. 1/4 टीस्पूनहिंग
  17. 4-5कडीपत्त्याची पान
  18. 2 टेबलस्पूनखोवलेल नारळ
  19. 2 टेबलस्पूनबारिक चिरलेली कोथिंबीर
  20. 1 टेबलस्पूनसाखर
  21. 6 टेबलस्पूनपाणी
  22. ढोकळा वाफवण्यासाठी इडली स्टॅन्ड

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    एका मोठ्या भांड्यात बाॅम्बे बेसन,दही,लिंबाचा रस,मीठ,हळद,आल मिरची पेस्ट घालून गरजेनुसार पाणी घालून गुठळ्या न होऊ देता पीठ भिजवून घ्यावे.

  2. 2

    गॅसवर इडली स्टॅन्ड ठेवून त्यात पाणी घालून 5-6 मिनिट पाणी ऊकळवू द्यावे.तोपर्यंत एका भांड्याला तेल लावून ढोकळा वाफवण्यासाठी हे भांड तयार करून घ्यावे. आता एका बाऊलमधे तेल व फ्रुट साॅल्ट एकत्र करून वरील पीठावर घालून पीठ व्यवस्थित हलवून घ्यावे.

  3. 3

    तयार पीठ तेल लावलेल्या भांड्यात ओतून घ्यावे. तयार इडली स्टॅडवर ढोकळ्याचे भांडे ठेवून झाकण लावून 15 मिनिट वाफवून घ्यावे. थोडे थंड झाल्यावर सुरी घालून ढोकळा झालाय हे बघून घ्यावे.

  4. 4

    आता कढईत तेल घालून तेल तापल्यावर त्यात मोहरी,जीरे,तीळ,कडीपत्ता व हिंग घालून फोडणी करून घ्यावी. फोडणी जरा गार झाल्यावर 3 टेबलस्पून पाण्यात साखर घालून ते पाणी गार झालेल्या फोडणीत घालून फोडणी तयार ढोकळ्यावर घालून वरून कोथिंबीर व खोवलेल नारळ घालून ढोकळा हव्या त्या आकारात कापून सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

Similar Recipes