खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#cooksnap
मी रूपाली अत्रे देशपांडे ची खमण ढोकळा ही रेसिपी थोडासा बदल करून कुक स्नॅप केली आहे.

खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)

#cooksnap
मी रूपाली अत्रे देशपांडे ची खमण ढोकळा ही रेसिपी थोडासा बदल करून कुक स्नॅप केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-45 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीबेसन पीठ
  2. 5-6लसूण पाकळ्या
  3. 4-5हिरवी मिरची
  4. 5-6 तुकडेआल्याचे
  5. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1.5 टेबलस्पूनसाखर
  7. 1/2 टेबलस्पूनसायट्रिक ऍसिड
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनहिंग
  10. 1 टेबलस्पूनइनो फ्रुट सॉल्ट
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. गरजेनुसार पाणी
  13. चवीनुसारमीठ
  14. फोडणीसाठी
  15. 1 टेबलस्पूनमोहरी
  16. 1 टेबलस्पूनजीरे
  17. 8-9कडी पत्ता पाने
  18. 2 टेबलस्पूनतेल
  19. 2 टेबलस्पूनसाखर
  20. 4 टेबलस्पूनपाणी
  21. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  22. 2 टेबलस्पूनओलं खोबरं

कुकिंग सूचना

40-45 मि
  1. 1

    प्रथम लसूण आलं मिरची कोथिंबीर याची पेस्ट करून घेणे. आता बेसन पीठ घेऊन त्यामध्ये साखर,सायट्रिक ऍसिड, हळद,हिंग तयार केलेली आले लसूण मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि तेल ॲड करणे.

  2. 2

    आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून छान ढोकळ्याचे बॅटर तयार करून घेणे एकाच साईडने हलवत पाच ते सात मिनिटे हे बॅटर मिक्स करत राहणे त्यामुळे पीठ छान हलके होते आता पाच मिनिट झाकण ठेवून बाजूला ठेवणे

  3. 3

    तो पर्यंत स्टीमर प्री हिट करून घेणे. मी कढई मध्ये पाणी टाकून त्यामध्ये एक प्लेट ठेवून 10 मिनिटे प्री हिट केले आहे. आता ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्‍या भांड्याला सर्व बाजूने तेल लावून घेणे.

  4. 4

    आता पाच मिनिटानंतर बॅटरमध्ये इनो ॲड करा आणि ॲक्टिवेट करण्यासाठी थोडेसे पाणी घाला त्यामुळे इनो ऍक्टिव्हेट होईल. आणि छान एकाच बाजूने बॅटर मिक्स करत रहा बॅटर जितका तुम्ही छान मिक्स कराल तितकाच ढोकळा छान स्पंजी बनतो.

  5. 5

    आता हे बॅटर ग्रीस केलेल्या पॉट मध्ये ऍड करून घेणे पॉट थोडासा टॅप करा जेणेकरून एअर बबल्स निघून जातात.आता स्टीम करण्यासाठी 20-25 मिनिटे ठेवून देणे.

  6. 6

    आता ढोकळा थोडासा थंड होऊ देणे आणि प्लेटमध्ये काढून घेणे.आपला मस्त असा टेस्टी स्पोंजी खमन ढोकळा तयार.

  7. 7

    आता फोडणी तयार करून घेणे त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर जीरे, मोहरी,कढीपत्ता, हिरवी मिरची चा मस्त तडका तयार करून घेणे. त्यामध्ये साखर आणि पाणी ऍड करून मिक्स करून घेणे.

  8. 8

    आता तयार ढोकळ्या वरती हा तडका टाकने वरून कोथिंबीर आणि खोबरे टाकून घेणे.

  9. 9

    ढोकळा कट करून घेणे आणि चिंचेची चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes