कांदा पात (kanda pat recipe in marathi)

Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729

अगदी कमी वेळात ही भाजी बनते .खायला अतिशय सुंदर लागते .ही मला माझ्या सासू ने शिकवली आहे .
#EB4 #W4

कांदा पात (kanda pat recipe in marathi)

अगदी कमी वेळात ही भाजी बनते .खायला अतिशय सुंदर लागते .ही मला माझ्या सासू ने शिकवली आहे .
#EB4 #W4

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
3 लोक
  1. 1जुडी कांदा पात
  2. 1 वाटीचना डाळ
  3. 3-4 हिरवी मिरची
  4. 5-6 लसूण पाकळ्या
  5. 1/2 टीस्पूनमोहरी
  6. 1/2 टीस्पून हळद
  7. 1 टोमॅटो
  8. 2 पळी तेल
  9. चवीनुसार तेल
  10. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    प्रथम कांदा पात स्वच्छ पाण्याने धुवून चिरून घ्यायची.मिरची आणि टोमॅटो चिरून घ्यायचे व लसूण ठेचून घ्यायचा.

  2. 2

    चण्याची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून थोड मीठ टाकून त्यामध्ये पाणी टाकून शिजवून घ्यायची. शिजवताना जास्त कोरडी करू नये.थोड पाणी असूद्या.म्हणजे भाजी कोरडी होत नाही.

  3. 3

    गॅस वर एक कढईत ठेवून त्या मध्ये तेल गरम करून घ्या व मोहरी टाका.मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकून भाजून घ्या.

  4. 4

    त्यानंतर यामध्ये हळद व कापलेली कांदा पात व डाळ टाकून चांगले परतून घ्या.

  5. 5

    भाजी चांगली एकजीव झाल्यावर त्यामध्ये चिरलेला टोमॅटो आणि मीठ टाकून मंद आचेवर झाकण लावून पाच ते दहा मिनिट शिजत ठेवा.

  6. 6

    डाळ आपण आधीच शिजवलेली असल्यामुळे ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही.फक्त एक लक्षात ठेवा.जास्त कोरडी करू नका.ही भाजी थोडी ओलसर छान लागते. पाणी पूर्ण सुकले असेल तर एक, दोन पाण्याचे हबके मारा.तुमची भाजी खाण्यासाठी तयार आहे.ही भाजी तांदळाच्या भाकरी सोबत छान लागते.

  7. 7

    यामध्ये तुम्ही भिजवलेली डाळ टाकू शकता. पण त्यामध्ये अशी चव येत नाही.करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729
रोजी
नवीन पदार्थ बनवायला आवडतात .पण या प्लॅटफॉर्म मूळे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली . त्यासाठी cook pad चे मनापासून आभार
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes