पिंक सॉस पास्ता (व्हेज) (pink sauce pasta recipe in marathi)

Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja

#EB10
#W10
या आठवड्याच्या 'ई-बुक' चॅलेंज साठी मी पिंक सॉस पास्ता करणार आहे. कॅफे स्टाईल हा पास्ता प्रकार तरुण वर्गात लोकप्रिय असणारा पदार्थ आहे.

पिंक सॉस पास्ता (व्हेज) (pink sauce pasta recipe in marathi)

#EB10
#W10
या आठवड्याच्या 'ई-बुक' चॅलेंज साठी मी पिंक सॉस पास्ता करणार आहे. कॅफे स्टाईल हा पास्ता प्रकार तरुण वर्गात लोकप्रिय असणारा पदार्थ आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अंदाजे 1 तास
4 जणांसाठी
  1. 2 कपपेने रिगाते पास्ता
  2. 1 लिटरपाणी
  3. मीठ
  4. 1/2 कपझुकीनी चिरून(हिरवी आणि पिवळी)
  5. 1/2 कपसिमला मिरची चिरून (रंगीत पण चालेल)
  6. 1/2 कपगाजर चिरून
  7. 2/4 कपब्रोकोलीचे तुरे
  8. 2 टीस्पून बारीक चिरलेला लसुण
  9. 2 टीस्पूनमिक्स हर्ब्स
  10. 2 टीस्पूटेबलस्पूननचिली फ्लेक्स
  11. 1 टेबलस्पूनकाळी मिरपूड
  12. 1 टीस्पून साखर
  13. चीझ
  14. बटर
  15. 1 कपमॅरीनारा सॉस (पास्ता सॉस)
  16. 1/2 कपफ्रेश क्रीम

कुकिंग सूचना

अंदाजे 1 तास
  1. 1

    प्रथम गॅसवर एक भांडे ठेवून भांड्यात पाणी घ्यावे आणि पाणी उकळू लागले की त्यात चमचाभर मीठ घालून पास्ता शिजण्यासाठी ठेवावा.
    पास्ता साधारण 80% शिजला की एका चाळणीत काढून त्यातील पाणी बाजूला काढावे. (हे पाणी फेकू नये) वरून गार पाणी ओतावे जेणेकरून पास्ता मोकळा होतो.

  2. 2

    आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात 1 चमचा बटर आणि 2 tbs तेल घ्यावे ते गरम झाले की त्यात लसुण, मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स घालून 10 सेकंद परतावे, त्यानंतर कढईत चिरलेल्या सर्व भाज्या घालून 2 मिनिटे परताव्यात.

  3. 3

    त्यानंतर चवीनुसार मीठ, साखर आणि काळीमिरी पुड घालावी आणि पुन्हा परतावे. त्यानंतर त्यात मॅरीनारा सॉस घालून ढवळावे. नंतर वरती पास्त्याच्या काढलेल्या पाण्यातील साधारण 2 कप पाणी घालावे आणि ढवळावे.
    भाज्या जास्त शिजवू नयेत, भाज्या थोड्या शिजल्या की त्यात पास्ता घालावा आणि ढवळावे.

  4. 4

    आता वरती फ्रेश क्रिम घालून. पास्ता निट ढवळून घ्या जेणेकरून सॉस (ग्रेव्ही) सगळीकडे लागेल. नंतर वर गरजेप्रमाणे चीझ आणि 1 चमचा बटर घालून ढवळावे, आणि तयार पास्ता गरमागरम सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja
रोजी
cooking हा माझा एक आवडता छंद आहे, वेगवेगळ्या रेसिपी try करायला मला खूपच आवडते माझे स्वयंपाकघर ही माझी प्रयोगशाळा आहे म्हणायला हरकत नाही. फक्त मी हाडाची vegetarian असल्याने veg रेसिपीच try करते. वेगवेगळ्या रेसिपी साठी लागणारी वेगवेगळी भांडी आणि त्या सर्व्ह करण्यासाठी आकर्षक अशी भांडी खरेदी करायला ही मला खुप आवडते
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes