व्हेज व्हाईट सॉस पास्ता (veg white sauce pasta recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#EB10 #W10
E- book विंटर स्पेशल रेसिपीज
'पास्ता' ही रेसिपी सर्व लहान थोर मंडळीनची आवडती रेसिपी.... 🥰 तर बघुया! "व्हेज व्हाईट सॉस पास्ता" रेसिपी.. 😊

व्हेज व्हाईट सॉस पास्ता (veg white sauce pasta recipe in marathi)

#EB10 #W10
E- book विंटर स्पेशल रेसिपीज
'पास्ता' ही रेसिपी सर्व लहान थोर मंडळीनची आवडती रेसिपी.... 🥰 तर बघुया! "व्हेज व्हाईट सॉस पास्ता" रेसिपी.. 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 लोकांकारिता
  1. 2 वाटी पास्ता
  2. 1 टेबलस्पून बटर
  3. 1/2 वाटीस्वीट कॉर्न
  4. 1सिमला मिरची
  5. 1गाजर
  6. 1कांदा
  7. व्हाईट सॉस साठी लागणारे साहित्य
  8. 1 टेबलस्पूनमैदा
  9. 2 टेबलस्पूनबटर
  10. मॉझरेल्ला चीज (इच्छेनुसार)
  11. 2 कपदूध
  12. 1 टीस्पून चिलीफेक्स
  13. 1 टीस्पूनटीस्पून ओरिगॅनो
  14. 1/2 टीस्पून काळीमिरी पावडर
  15. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम पास्ता त्याच्या दुप्पट पाणी, एक चमचा तेल व चवीनुसार मीठ घालून उखळवून घ्यावा. खूप शिजवू नये. आवश्यक तेवढा पास्ता शिजल्याची खात्री करून त्यातील जास्तीचे पाणी काढावे. व पास्ता निथळत ठेवून दयावा. सिमला मिरची, गाजर, कांदा यांचे तुकडे करून घ्यावेत.

  2. 2

    व्हाईट सॉस करतेवेळी, गॅसवर पॅन गरम करून त्यात बटर घालावे व मैदा भाजून घ्यावा. मैदा अगदी ब्राऊन करू नये. त्यानंतर त्यात वर सांगितल्याप्रमाणे सॉस साठी लागणारे दूध व मीठ सर्व साहित्य घालावे.

  3. 3

    दूध घातल्यानंतर मिश्रण एकसारखे हलवत रहावे म्हणजे गाठी होणार नाहीत. एक उखळी व मिश्रण दाटसर होत आले की चवीनुसार मीठ घालून सॉस तयार करावा.

  4. 4

    गॅसवर मिडीयम आचेवर पॅनमध्ये सर्व भाज्या, चवीनुसार मीठ घालून परतून घ्यावे. त्यानंतर त्यात उकडलेला पास्ता व व्हाईट सॉस घालून एक उखळी आणावी. आवश्यकतेनुसार वरून काळीमिरी पावडर, चिलीफ्लेक्स, चीज घालावे.

  5. 5

    गरमागरम होम मेड पास्ता चीज घालून सर्व्ह करावा. 🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

Similar Recipes