कशाय इम्युनिटी बुस्टर काढा/पेय (immunity booster kada recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

कशाया हे एक उत्तम इम्युनिटी बुस्टर ड्रिंक आहे. दुध हळद तर आपण रोजच पितो मात्र हे सुद्धा अतिशय उत्तम असे बुस्टर आहे यात हळद, गुळ,सुंठ तर आहेच सोबत खडे मसाले आहेत ज्यांचे प्रत्येकाचे वैशिष्ट्य आहे .चला तर मग बनवूयात कशाया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनट
एक ग्लास
  1. 1/2 कपधने
  2. 6हिरवी वेलची
  3. 1/4 कपजीरे
  4. 2 टीस्पूनकाळे मिरे
  5. 1 टेबलस्पूनसौफ
  6. 10लवंगा
  7. 2 टेबलस्पूनगुळ
  8. 1/2 कपदूध
  9. 2-1/5 कपपाणी

कुकिंग सूचना

20मिनट
  1. 1

    सर्वप्रथम कषाय चूर्ण बनवण्यासाठी सर्व मसाले एका ठिकाणी काढून घ्यावेत आता कढईत गरम करून त्यात धने, जीरे,सौफ आणि सर्व मसाले मंद आचेवर गरम करून घ्यावेत.

  2. 2

    चागंले गरम झाल्यावर गॅस बंद करून सर्व मसाला थंड करून घ्यावे.थंड झाल्यावर मिक्सर च्या भांड्यात काढून घ्यावे.आता त्यातच हळद आणि सुंठ घालून मिक्सर करून घ्यावे.

  3. 3

    बारीक करून घ्यावे.हे तयार झाले आपले कशाया चूर्ण. हे चूर्ण आपण तयार करून काचेच्या बरणीत भरून ठेवावे म्हणजे ते आपण केव्हाही वापरू शकतो. आता एका भांड्यात पाणी गरम करून त्यात कशाया पावडर एक टेबलस्पून टाकून पाच मिनिट उकळावी. त्यातच आवडीनुसार गुळ घालुन घ्यावे.

  4. 4

    गुळ विरघळून गेला की गॅस बंद करून दोन तीन मिनिट थांबून त्यात दूध घालून घ्यावे.गरम गरम प्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
थँक्स , जवस नाही घातले तर मग फोटोत काय आहे ?

Similar Recipes