जीरा खाकरा (Jeera khakara recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#EB14 #W14
सध्या आपण बघतो मआपल्या सगळ्यांचाच हेल्दी स्नॅक खाण्यावर भर असतो. आमच्याकडे तर लेकीला तळरेल नको खूप मसालेदार नको मग काय कराव असा प्रश्न पडतो पण त्यावर अगदी सोपा ऊपार म्हणजे हा आपला गुजराती अगदी पौष्टिक आणि हलीआ स्नॅक. माझ्या मुलीला सगळ्यात जास्त हा जीरा खाकरा आवडतो म्हणुन सतत हाच बनवला जातो.बघुया ह्याची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपगव्हाच पीठ
  2. 1 टेबलस्पूनहरबरा डाळीच पीठ
  3. 1 टेबलस्पूनभाजलेले जीरे
  4. चवीनुसारमीठ
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. 4 टेबलस्पूनदूध
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. लाटण्यासाठी गव्हाच पीठ
  10. तवा
  11. पोळपाट व लाटण

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    गव्हाच पीठ,डाळीच पीठ,मीठ,हिंग,हळद व तेल घालून दुध्त घट्ट भिजवून घ्यावे.

  2. 2

    आता भिजवलेल्या पीठाचा छोटा गोळा घेऊन लाटण्याने अगदी पातळ लाटून घ्यावा.

  3. 3

    नाॅनस्टिक तव्यावर मंद गॅसवर लाटलेला खाकरा मलमलच्या कापडाने दाबुन सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावा.

  4. 4

    तयार खाकरा थंड झाल्यावरहवाबंद डब्यात घालून ठेवावे. हे खाकरे 2-3 महिने सहज टिकतात अर्थात घरातल्यांनी शिल्लक ठेवले तरच😍😋

  5. 5

    खाकरा सर्व्ह करताना वरून साजुक तुप व शेंगादाण्याची लसणाची चटणी घालून सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

Similar Recipes