खारी शंकरपाळी (Khari shankarpali recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

माझ्या नातवाची शाळा सुरू झाली आणि त्याला डब्यात ‌काय द्यावे हा प्रश्न त्याच्या आईला पडायला लागला.काही अंशी तिची समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करत असते.आज त्याला बाईट घेता येईल ‌असा पदार्थ हवा होता म्हणून मी शंकरपाळी केली अगदी त्याला आवडेल अशी खमंग, खुसखुशीत!! मस्तच झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 ते 3/4 तास
  1. 250 ग्राममैदा
  2. 1 टिस्पून ‌ ‌ओवा
  3. मीठ चवीनुसार
  4. तेल तळण्यासाठी आणि मोहना साठी

कुकिंग सूचना

1/2 ते 3/4 तास
  1. 1

    मैदा चाळून घ्या.

  2. 2

    त्यात मीठ आणि 2 टेबलस्पून तेल तापवून मोहन,ओवा घालून घट्ट पीठ मळून घ्या.बाजूला ठेवा.

  3. 3

    तासाभराने पिठ छान मळून घ्या.एक मोठी लाटी घेऊन पोळपाटावर पातळ पोळी लाटून कातण्याने शंकरपाळी कापून घ्या.

  4. 4

    कढईत तेल तापवून त्यात मंद आचेवर शंकरपाळी तळून घ्या.थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.महिनाभर टिकतात, छान खमंग, खुसखुशीत होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes