"मेदू वडा सँडविच"(Medu Vada Sandwich Recipe In Marathi)

Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
वसई / महाराष्ट्र

#SIR
" मेदू वडा सँडविच "

साऊथ इंडियन फूड तर माझं खूपच आवडत आहे, कारण ते बनवायला तर सोप आहेच, सोबत चवीला ते छान असतच आणि पौष्टिकता पण खूप मोठ्या प्रमाणात त्यात बघायला मिळते.
मी आज मेदुवडा सँडविच बनवून पाहिले, रोजच्याच मेदुवड्याला थोडा ट्विस्ट...👍

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

4तास 30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. मेदु वडे बनविण्यासाठी
  2. 2 कपउडीद डाळ
  3. गरजेनुसार पाणी
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1 इंचआल
  6. कडीपत्ता पाने
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. तुकडेओल्या नारळाचे
  9. चवीनुसारमीठ
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. 2 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  12. चटणी बनविण्यासाठी
  13. 1 कपखवलेला ओला नारळ
  14. 1 छोटाकांदा
  15. 2हिरव्या मिरच्या
  16. 6-7लसूण पाकळ्या
  17. 1 टेबलस्पूनदही
  18. 2 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  19. चवीनुसारमीठ आणि साखर / लिंबाचा रस
  20. कोथिंबीर आणि पुदिना पाने
  21. फोडणीसाठी
  22. 1 टेबलस्पूनतेल
  23. 1 टीस्पूनजीरे
  24. 1 टीस्पूनमोहरी
  25. चिमुटभरहिंग
  26. लाल सुक्या मिरच्या
  27. कडीपत्ता पाने

कुकिंग सूचना

4तास 30 मिनिटे
  1. 1

    उडीद डाळ स्वच्छ धुवून 4 तास भिजत ठेवा.
    नंतर निथळून घ्या, वाटताना जास्त पाणी वापरू नये.

  2. 2

    डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून घ्या, त्यात हिरवी मिरची घालून डाळ वाटून घ्या
    नंतर वाटलेली डाळ एका मिक्सिंग वाटी मध्ये काढून घ्या, ते हाताने किंवा व्हिस्कर ने फ्लफी होई पर्यंत फेटून घ्या आणि त्यात जीरे, आल, कोथिंबीर, कडीपत्ता, ओल्या नारळाचे तुकडे घालून मिक्स करा.
    शेवटी 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करा, त्यात चवीनुसर मीठ घालून घ्या आणि मिश्रण 5 मिनिट बाजूला ठेवा

  3. 3

    मिश्रण नीट झाल आहे का ते बघण्यासाठी एका वाटी मध्ये पाणी घ्या, आणि मिश्रणाचा छोटा गोळा करून त्यात घालून बघा, मिश्रण जर पाण्यावर तरंगत असेल तर मिश्रण परफेक्ट आहे.
    हाताला पाणी लावून पिठाच्या गोळ्याला वड्याचा आकर देऊन घ्या.

  4. 4

    आणि गरम तेलात वडे सोनेरी रंगावर तळून घ्या

  5. 5

    चटणी बनविण्यासाठी लागणारे जिन्नस मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या आणि बाजूला ठेवा

  6. 6

    वड्याला मधून कापून घ्या, एका भागावर
    तयार चटणी पसरवून घ्या आणि तयार फोडणी त्यावर पसरवून घ्या.

  7. 7

    वड्याचा दुसरा भाग चटणी वर ठेवून द्या. आणि सजवून घ्या.
    आपले मदुवडा सँडविच बनवून तयार आहे.
    मुलांना ही ट्विस्ट नक्कीच आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
रोजी
वसई / महाराष्ट्र
Hello friends, I'm shital raut ,I'm a nursing professional but extremely passionate about food and cooking ,i love to celebrate each and every day with life And good lifestyle...!!i love to faces multiple tasks...!!So here imSo let's get started...😊follow me for recipe videos on Instagram@brunch4appetite#Amother#youtuber#homechef #instagrammer
पुढे वाचा

Similar Recipes