मेदू वडा(meduwada recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

आज सकाळी नाश्त्याला मेदू वडा बनवला. खूप टेस्टी झालेला... सोबतीला सांबार व चटणी होतीच..... त्याशिवाय कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थाला चव नाही...

मेदू वडा(meduwada recipe in marathi)

आज सकाळी नाश्त्याला मेदू वडा बनवला. खूप टेस्टी झालेला... सोबतीला सांबार व चटणी होतीच..... त्याशिवाय कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थाला चव नाही...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनिट (२ तास डाळ भिजवून ठेवण्यासाठी)
४-५ जणांसाठी
  1. 3 कपउडिद डाळ
  2. १०-१२ कडीपत्त्याची पाने
  3. 1/2 टीस्पूनजिरे
  4. चवीनुसारमीठ
  5. 2 कपतेल
  6. 1 कपखोवलेला नारळ
  7. 4-5लसूण पाकळ्या
  8. 1/2 टीस्पूनचिंच
  9. 2 टीस्पूनपंढरपुरी डाळ
  10. तडका देण्यासाठी
  11. 1 टीस्पूनतेल
  12. 1/2 टीस्पूनमोहरी
  13. 7-8कडीपत्ता पाने
  14. 1/2 टीस्पूनजिरे
  15. 2सुक्या लाल मिरच्या
  16. चिमुटभरहिंग
  17. 1 टीस्पून उडीद डाळ
  18. सांबार साठी
  19. 1 कपतूर डाळ
  20. 1वांगे
  21. 1टॉमॅटो
  22. 1कांदा
  23. 3 टीस्पूनसांबार मसाला
  24. 1/2हळद
  25. 1 टीस्पूनलाल मसाला
  26. 7-8कडीपत्ता पाने
  27. १/२ टिस्पून मोहरी
  28. १/२ टिस्पूनजिरे
  29. १/२ टिस्पूनहिंग
  30. चवीनुसारमिठ
  31. 2 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

४० मिनिट (२ तास डाळ भिजवून ठेवण्यासाठी)
  1. 1

    उडीद डाळ स्वच्छ धुऊन घ्या व पाणी टाकून २ तास भिजत ठेवा. सगळ्यात आधी चटणी करून घ्यावी. मिक्सर च्या भांड्यात खोबरे, मिरची, लसूण, मीठ, चिंच, पंढरपुरी डाळ व थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घ्या आता तडका देण्यासाठी एका भांड्यात तेल टाकून त ते तापले की जिरा, मोहरी, कडीपत्ता, हिंग, लाल मिरची व उडीद दाल टाकून चटणी ला फोडणी द्या.

  2. 2

    आता सांबार करून घ्या प्रथम डाळ स्वच्छ धुऊन घ्या त्यात ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या टका व पाणी टाकून ४ शिट्ट्या कारा. कुकर थंड झाला की एका टोपात तेल गरम करून त्यात मोहरी जिरे, कडीपत्ता, हिंग टाकून डाळ टाका. आता त्यात सांबार मसाला, हळद, लाल मसाला टाका. मिक्स करून उकळी आली की मिठ टाका व १० मि. उकळून घ्या. आता वडे सांबार व चटणी सोबत सर्व्ह करा😀

  3. 3

    त्यानंतर मिक्सर मध्ये पाणी न टाकता डाळ बारीक वाटून घ्या. आता बॅटर एका भांड्यात घेऊन १० मी. हाताने फेटून घ्या आता त्यात जीरे मीठ कडीपत्ता हाताने तोडून टाका मिक्स करून तेलात तळून घ्या. गोल्डन झाले की काढून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

Similar Recipes