वडा पाव (vada pav recipe in marathi)

जान्हवी आबनावे
जान्हवी आबनावे @cook_27681782

#स्नॅक्स
#साप्ताहिक_स्नॅक_प्लॅनर
#वडा_पाव
वडा पाव हा पदार्थ आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. हातगाडी ते मोठ्या हाॅटेलमध्ये हा वडा पाव सहजपणे मिळतो. गरीबांचा हा बर्गर म्हणून ओळखला जातो.
प्रत्येक भागात तो आपल्या विशेष पद्धतीने बनवला जातो ..
चला तर बघू या वडापाव ची रेसिपी 😊

वडा पाव (vada pav recipe in marathi)

#स्नॅक्स
#साप्ताहिक_स्नॅक_प्लॅनर
#वडा_पाव
वडा पाव हा पदार्थ आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. हातगाडी ते मोठ्या हाॅटेलमध्ये हा वडा पाव सहजपणे मिळतो. गरीबांचा हा बर्गर म्हणून ओळखला जातो.
प्रत्येक भागात तो आपल्या विशेष पद्धतीने बनवला जातो ..
चला तर बघू या वडापाव ची रेसिपी 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. 6बटाटा
  2. 5-6 हिरव्या मिरच्या
  3. 7-8लसूण पाकळ्या
  4. 1 इंचआल
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1/2 टीस्पूनजीरे
  7. 8-10 कढीपत्ता पाने
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1/4 टीस्पूनहिंग
  10. 1 टीस्पूनमीठ
  11. कोथिंबीर
  12. बॅटरसाठी साहित्य
  13. 1 कपबेसन
  14. 1/2 टीस्पूनमीठ
  15. 1/4 टीस्पूनहळद
  16. चिमूटभरसोडा
  17. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    कुकर मध्ये सहा बटाटे तीन शिट्टी देऊन शिजवून घ्यावे. बटाटा साल काढून हाताने कुस्करून घ्या. लसूण, आल,मिरची यांची पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, कढीपत्ता, मिरचीची पेस्ट घालून परतून घ्यावे. हळद,हिंग घालून बटाटा घालून एकञ करून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे. वरून कोथिंबीर घालून मिक्स करावे. वरून हवा असल्यास लिंबाचा रस घालू शकता.

  3. 3

    भाजी पुर्ण थंड होऊ द्या.भाजीचे गोलाकार वडे करून घ्यावे.

  4. 4

    एक कप बेसन घेऊन त्यात हळद, मीठ, सोडा घालून थोड थोड पाणी घालून बॅटर तयार करुन घ्यावे.

  5. 5

    कढईत तेल गरम करून त्यात पिठात वडा घोळवून तेलात सोडावे.. मंद आचेवर वडा तळून टिशू पेपर वर काढून घ्या. गरम गरम वडा लसणाची चटणी, तळलेली हिरवी मिरची, पावाबरोबर खायला घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
जान्हवी आबनावे
रोजी

Similar Recipes