भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#HV
कोहळा, शेंगा ,भेंडी, टोमॅटो ,कांदा घालून केलेला सांबार खूप,

भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi)

#HV
कोहळा, शेंगा ,भेंडी, टोमॅटो ,कांदा घालून केलेला सांबार खूप,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीतूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ
  2. 2शेवग्याच्या शेंगा,एक छोटा तुकडा कोहळ्याचा,सहा ते सात भेंडी, दोन टोमॅटो, दोन कांदे
  3. 2 मोठा चमचासांबार मसाला, पाव चमचा हळद,एक चमचा तिखट
  4. 1/2 चमचामोहरी, पाव चमचा मेथी, चिमूटभर हिंग
  5. थोडीशी कोथिंबीर धुवून बारीक कापलेली
  6. 1 टेबलस्पूनतेल
  7. 2 चमचेचिंचेचा कोळ
  8. चवीनुसारमीठ,सुपारी एवढा गुळ
  9. 15कढीपत्त्याची पाने

कुकिंग सूचना

35मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या धुवून त्या कापून घ्याव्या मग त्या कुकरच्या भांड्यात पाणी न घालता ठेवाव्या व दुसऱ्या भांड्यामध्ये दोन्ही डाळी धुवून त्यामध्ये पाणी घालून कुकरमध्ये लावून तीन शिट्ट्या कराव्या गॅस बंद करावा

  2. 2

    कुकर थंड झाला की डाळ घोटून घ्यावी मग गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं मेथी मोहरी हिंग कढीपत्ता यांची खमंग फोडणी करावी त्यामध्ये आधी हळद, तिखट व सांबार मसाला घालावा व परतावा मग घोटुंन घेतलेली डाळ घालून डाळीचं भांड धुवून पाणी घालावं

  3. 3

    मग त्याच्यामध्ये मीठ व गूळ घालावं व चिंचेचा कोळ घालावा व छान उकळू द्यावं छान उकळून एकजीव झालं की त्यामध्ये शिजलेल्या भाज्या घालाव्यात व अजून मंद गॅसवर पाच मिनिटे उकळू द्या

  4. 4

    त्यामध्ये कोथिंबीर घालावी व अजून दोन मिनिटांसाठी उकळून गॅस बंद करावा अतिशय टेस्टी व पौष्टिक असा आंबट गोड तिखट सांभार तयार होतो तो गरम गरम लाल भाताबरोबर किंवा साध्या भाताबरोबर आपण खाऊ शकतो,इडली सांबार, डोसा सांबार कशाबरोबरही आपण खाऊ शकतो खूप सुंदर व टेस्टी असा होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes