शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#GR2
झटपट केलेला शेवयाचा उपमा खूप टेस्टी व सुंदर होते चवीला व पचायलाही खूप हलका असतो

शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)

#GR2
झटपट केलेला शेवयाचा उपमा खूप टेस्टी व सुंदर होते चवीला व पचायलाही खूप हलका असतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
  1. 1 मोठी वाटी भरून शेवया बारीक केलेल्या
  2. मोठा कांदा बारीक कापलेला
  3. 1इंचआलं किसलेलं
  4. 3लाल मिरच्या, एक चमचा चिली फ्लेक्स
  5. 1/2 चमचाजीरे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग एक चमचा चणाडाळ उडीद डाळ मिक्स
  6. 15कढीपत्त्याची पाने
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. चवीनुसारमीठ अर्धा चमचा साखर
  9. 1/4 वाटीशेंगदाणे,पाव वाटी खोवलेलं नारळ
  10. अर्ध्या लिंबाचा रस
  11. कोथिंबीर थोडीशी धुवून बारीक कापलेली

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल तापले की हिंग मोहरी जिरं व डाळी घालून करून त्यामध्ये कांदा घालावा व मिरची घालावी व कढीपत्ता घालून छान परतावे मग त्यामध्ये दाणे घालावेत व तेही छान लालसर परतावे मग त्यामध्ये चिली फ्लक्स व नूडल्स घालावेत व छान परतून त्यामध्ये गरम पाणी घालावे

  2. 2

    मग त्यामध्ये लिंबाचा रस मीठ साखर व कोथिंबीर आल्याचा किस घालून छान परतावे व मिश्रण घट्ट होऊ द्यावे

  3. 3

    घट्ट होऊन सुट्ट झालं की त्यामध्ये उरलेली कोथिंबीर व खोवलेलं ओलं खोबरं घालून परत एकजीव करावे व गरम गरम खायला द्यावे हा उपमा पचायला एकदम हलका व चवीला उत्तम व खूप पौष्टिक आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes