सांबार (Sambar Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

सोप्या पद्धतीने घरात असलेल्या भाज्या टाकून पारंपारिक पद्धतीने केलेला हा सांबार भाताबरोबर इडलीबरोबर डोसा बरोबर आपण खाऊ शकतो

सांबार (Sambar Recipe In Marathi)

सोप्या पद्धतीने घरात असलेल्या भाज्या टाकून पारंपारिक पद्धतीने केलेला हा सांबार भाताबरोबर इडलीबरोबर डोसा बरोबर आपण खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतूरडाळ, अर्धा वाटी मूग डाळ
  2. 1 टेबलस्पूनसांबार मसाला
  3. कांदे दोन, टोमॅटो दोन
  4. 2 शेवग्याच्या शेंगा पाच भेंडी
  5. सुपारीएवढा गूळ, चवीनुसार मीठ
  6. 1/4 चमचाहळद,1 चमचा तिखट
  7. 1/2 चमचामोहरी ,पाव चमचा हिंग,पाव चमचा मेथी
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. 15कढीपत्त्याची पाने,थोडीशी कोथंबीर
  10. 3 टीस्पूनचिंचेचा कोळ

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    प्रथम दोन्ही डाळी धून भिजत ठेवाव्या मग त्या कुकरला मीठ, हिंग, हळद टाकून गाळ शिजवून घ्याव्या

  2. 2

    कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे
    हिंग,मोहरी,मेथी,कढीपत्ता यांची खमंग फोडणी करावी मग त्यामध्ये कांदा,टोमॅटो उभा कापलेला शेंगांचे तुकडे व भेंडीचे तुकडे करून घालावे व चिंचेचा कोळ घालावा थोडंसं मीठ घालावं व शिजत ठेवावे

  3. 3

    मग त्यामध्ये हळद,तिखट,गूळ, सांबार मसाला घालावा छान उकळू द्यावा व मग डाळ घोटून त्यामध्ये घालावी कोथिंबीर घालावी चव बघून त्याप्रमाणे मीठ घालावे व एक दहा मिनिटे मंद गॅसवर छान उकळू द्यावे.
    चविष्ट सांबर तयार होतो त्याबरोबर इडली डोसा भात खाऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes