मटार राइस (Matar Rice Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

मटार राइस (Matar Rice Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीअख्खा बासरी तांदूळ
  2. 1/2 वाटीमटार
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 6पाकळ्या लसूण
  7. 1 टेबलस्पूनआल्याचे तुकडे
  8. 2 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/2 टीस्पूनगोडा मसाला
  10. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  11. 1 टीस्पूनमोहरी
  12. 1 टीस्पूनजीरे
  13. 1 टीस्पूनहळद
  14. 1/4 टीस्पूनहिंग
  15. 1 टेबलस्पूनमीठ चवीप्रमाणे
  16. 6 टेबलस्पूनतेल
  17. 2 &1/2 वाटी गरम पाणी राइस शिजवण्या साठी
  18. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  19. कडीपत्ता
  20. कोथिंबीर

कुकिंग सूचना

35 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सगळ्याची तयारी करावी. बासमती तांदुळ एक वाटी पाणी घालून भिजत ठेवावा साधारण 10 मिनिटं. कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यावा.

  2. 2

    आता कढई मध्ये तेल घालून गरम करून मोहरी जीरे यांची फोडणी द्यावी. त्यानंतर मिरची, आले आणि लसूण घालावा.

  3. 3

    आता लसूण थोडा लालसर झाल्यावर कांदा घालावा आणि थोडा परतावा. त्यानंतर मटार घालावी आणि थोडी परतून घ्यावी.

  4. 4

    आता त्यामध्ये टोमॅटो घालावा आणि चांगला परतून घ्यावा. त्यानंतर हळद आणि हिंग घालावे आणि परतून घ्यावे. त्यानंतर सर्व मसाले घालावे- लाल तिखट, गोडा मसाला, गरम मसाला, आणि चांगले मिक्स करून परतून घ्यावे. एका बाजूला 2 & 1/2 वाटी पाणी गरम करायला ठेवावे.

  5. 5

    भिजवलेल्या तांदूळ मधून पाणी काढून टाकावे आणि बासमती तांदूळ कढई मध्ये घालावा आणि चांगला मिक्स करून घ्यावा. त्यामध्ये मीठ घालावे आणि कोथिंबीर घालावी आणि चागले मिक्स करून परतून घ्यावे.

  6. 6

    आता गरम केलेले पाणी घालावे आणि 2 टेबलस्पून साजूक तूप घालावे. आता कढईवर झाकण ठेवून 8-10 मिनिटे शिजू द्यावे. गॅस मध्यम ठेवावा.

  7. 7

    आता आपला मटर राईस तयार झाला आहे. गरम गरम सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes