मुखवास, पुदिना गोळी (Mukhwas Pudina Goli Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

#LCM1
विविध प्रकारच्या पाककृती करून एखादी सुगरण गृहिणी ज्याप्रमाणे जेवणाचे ताट रंगतदार बनवते,त्याचप्रमाणे जेवणानंतरचा मुखववासही तितकाच विविध रंगी असावा यासाठी ती दक्ष असते. निसर्गाने आपल्याला भरभरून अशा गोष्टी दिलेल्या आहेत त्याचाच वापर करून पाचक अशी पुदिन्याची गोळी कशी करायची ते आज आपण बघूया!!

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१५ मिनिटे
२०
  1. 3 टेबलस्पूनपुदिना पावडर
  2. 5 टेबलस्पूनपिठीसाखर
  3. 1/2 टीस्पूनसैंधव मीठ
  4. 1/2 टीस्पूनमीठ
  5. 2 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  6. 2 टेबलस्पूनआमचूर पावडर
  7. 1 मोठा चमचालिंबू रस

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम पुदिन्याची फक्त पान वेगळी काढून धुवून,पंख्याखाली सुकून जाळीच्या डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये चार-पाच दिवस ठेवावीत. फ्रीजमध्येच ती छान कुरकुरीत सुकतात आणि त्याचा हिरवागार रंगही तसाच राहतो. त्यानंतर ती पानं मिक्सरला फिरवून घ्यावित,जर मिक्सरला पूर्ण बारीक झाली नाहीत तर त्यामध्येच साखर घालून बारीक पावडर करता येते.

  2. 2

    ह्या पुदिना आणि साखरेच्या पावडर मध्ये वरील इतर साहित्य घालून गरजेप्रमाणे आवश्यक तेवढाच लिंबाचा रस घालून घट्ट गोळा मळून घ्यावा आणि त्या गोळ्याच्या आपल्याला हव्या तेवढ्या छोट्या छोट्या गोळ्या करून घ्याव्यात आणि त्या पिठीसाखरेमध्ये घोळून हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.

  3. 3

    घरी बनवलेल्या अशा ह्या पाचक पुदिना गोळ्या तुम्हाला नक्कीच आवडतील.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

Similar Recipes