सात्विक पंचामृत केक (Satvik Panchamrut Cake Recipe In Marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#केक ...वेगवेगळ्या प्रकारचा केक करताना आज मी केलेला आहे पंचामृताचा केक ... त्यामध्ये पंचामृतामध्ये वापरण्यात येणारे पाच पदार्थ वापरलेले आहे . खूप छान चविष्ट होतो हा केक .नक्की करून पहा.

सात्विक पंचामृत केक (Satvik Panchamrut Cake Recipe In Marathi)

#केक ...वेगवेगळ्या प्रकारचा केक करताना आज मी केलेला आहे पंचामृताचा केक ... त्यामध्ये पंचामृतामध्ये वापरण्यात येणारे पाच पदार्थ वापरलेले आहे . खूप छान चविष्ट होतो हा केक .नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
  1. 1-1/2 कपरवा
  2. 1/2 कपदूध
  3. 1/2 कपदही
  4. 1/4 कपसाजूक तूप
  5. 2 टेबलस्पूनमध
  6. 1/4 कपसाय
  7. 1 कपबारीक पिठी साखर
  8. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  9. 1-1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  10. 1 टेबलस्पूनतीळ
  11. 2 टेबलस्पूनसुकामेवा कप
  12. 1/4 टीस्पूनकेसर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्व सामग्री एकत्र ठेवावे ज्या मोल्डमध्ये केक करायचा आहे त्याला आतून तूप लावून मैदा किंवा कणिक सुद्धा लावून घ्यावे. सुकामेव्याच्या कापांना मैदा किंवा कणीक लावून घ्यावे. म्हणजे ते बुडाला बसत नाही केकच्या. प्रमाणे थोड्याशा कोमट दुधामध्ये केसर टाकून घ्यावे.

  2. 2

    आता एका बाऊलमध्ये दही, साय, साखर आणि मध एकत्र करून घ्यावे आणि चांगले फेटून घ्यावे.

  3. 3

    चांगले फेटून घेतल्यानंतर आता त्यात बारीक रवा घ्यावा. रवा बारीकच वापरावा.

  4. 4

    एकदा चांगले मिक्स केल्यानंतर आवश्यकतेनुसार त्यात दूध टाकावे. आणि झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवावे.

  5. 5

    मिश्रण घट्ट झालेले दिसेल पंधरा वीस मिनिटांनी. नंतर केसर टाकलेले दूध टाकून घ्यावे. आता पुन्हा आवश्यकतेनुसार दूध टाकावे आणि मिक्स करून घ्यावे. तोपर्यंत बाजूला गॅसवर कुकर प्री हिट करण्यासाठी ठेवावा.

  6. 6

    आता त्या मिश्रणात सुकामेवा, तीळ टाकून मिक्स करावे.

  7. 7

    त्यानंतर त्यात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकावे. त्याला ऍक्टिव्हेट करण्याकरता वरून थोडे दूध टाकावे. आणि मिक्स करून घ्यावे. रिबन कन्सिस्टन्सी चे मिश्रण असावे. त्यानंतर केक मोल्डमध्ये तयार केलेले मिश्रण ओतावे.

  8. 8

    केक मोल्ड थोडा टॅप करून घ्यावा. म्हणजे त्यातील एअर बबल निघून जातील. त्यानंतर वरून सुकामेवा आणि तिळाने गार्निश करून मोल्ड गरम झालेल्या कुकरमध्ये ठेवावे. कमी ते मध्यम आचेवर हा केक चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे शिजवावा. मध्ये एखाद्या वेळेला टूथपिक टाकून केक शिजल्याची खात्री करून घ्यावी.

  9. 9

    केक शिजल्यानंतर गॅस बंद करावा आणि केकचा मोल्ड बाहेर काढून थंड करावा. चाकूच्या साह्याने त्याच्या कडा सोडवून घेऊन प्लेटमध्ये उलटा करून घ्यावा.मस्तपैकी छान स्पंजी केक तयार आहे.

  10. 10

    आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे सजावट करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes