पंचामृत रवा केक

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#रवा
हा पंचामृत रवा केक बरेच दिवस करायचा मनात होता पण थोडी धाकधूक होती ती म्हणजे मधाचा समावेश असल्यामुळे त्या केकची चव कशी असेल ह्याची...... पंचामृत म्हणजे त्यात दूध, दही, तूप, साखर, मध हे पाच जिन्नस. पण या केकमध्ये मधाची चव इतकी अप्रतिम लागतेय म्हणून सांगू....... तुम्ही करून बघाच एकदा तरी, परत परत करून खावासा वाटेल...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनिटे
५ जण
  1. 1 कपबारीक रवा
  2. 1/2 कपदूध
  3. 1/2 कपदही
  4. 1/4 कपतूप
  5. 1/4 कपसाखर
  6. 2 टेबल स्पूनमध
  7. 2 टि स्पून केशरदूध
  8. 1/2 टि स्पून बेकिंग पावडर
  9. 1/4 टि स्पून बेकिंग सोडा

कुकिंग सूचना

४० मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य तयार ठेवा. भांड्यात दही, दूध घ्या.

  2. 2

    तूप, साखर, मध घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे झालं आपलं पंचामृत तयार.

  3. 3

    या पंचामृतात रवा घालून चांगलं एकजीव करा व ४-५ तास झाकून ठेवा.

  4. 4

    मायक्रोवेव्ह २०० डिग्री सेल्सिअसला १० मिनिटे प्रिहिट करायला ठेवा. पाच तासानंतर त्यात केशरयुक्त दूध व बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून मिक्स करा. (जास्त ढवळू नये)

  5. 5

    केकटीन मध्ये खाली बटर पेपर लावून बाजूने तूप लावून घ्या. त्यात मिश्रण ओता. वरून बदाम पिस्त्याचे काप घालून सजवा. मायक्रोवेव्हमध्ये १८० डिग्री सेल्सिअसला ३५-४० मिनिटे बेक करा.

  6. 6

    काढून थंड होऊ द्या मग स्लाईस कापून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes