बाजरी बर्फी (Millet Burfi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

प्राचीन काळात पाळेमुळे असलेल्या "मिलेट" या धान्य प्रकारात ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, वरई, कोडी,जवस इत्यादी धान्ये ओळखली जातात.
आज, भारत सरकारच्या प्रवर्तकीय प्रयत्नांमुळे United Nations ने *२०२३* हे वर्ष *जागतिक मिलेट वर्ष* म्हणून जाहीर केले आहे.
फास्टफूडच्या जोमाने वाढत्या काळरुपी अजगराने सर्वाधिक पोषक द्रव्ये, पौष्टिकता आणि Fibers असलेल्या मिलेट धान्यांची आहारातील जागा हिसकावून घेतली व माणूस Unhealthy आहार आणि विकार यांच्या जाळ्यात अडकला...... म्हणतात ना... "देर आए दुरुस्त आए".... चला तर.... *जागतिक मिलेट वर्ष* Celebrate करण्याच्या निमित्ताने रोजच्या आहारात "मिलेट" धान्यांचा समावेश करुया... आणि Healthy जीवनाचा आनंद घेऊया......
प्रिय खवय्यांनो.....!!!
सादर आहे... *बाजरी बर्फी*... फायबर्स आणि प्रोटीन्स ने युक्त..,.. लहान-मोठ्या सर्वांना आवडेल अशी..... 🥰😊👌
©Supriya Vartak-Mohite

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ जणांसाठी
  1. 1कप बाजरी पीठ
  2. 1कप खजूर (अर्धा तास गरम पाण्यात भिजवून ठेवलेला)
  3. 1/2कप मिक्स ड्रायफ्रुट्स (8 बादाम , 10, काजू आणि 5 अक्रोड)
  4. 1कप शुद्ध तुप
  5. 1टेबल स्पून कोको पाउडर (ऐच्छिक)
  6. 1/2टी स्पून सुंठ पाउडर
  7. 1/2टी स्पून वेलची पाउडर

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम मिक्स ड्रायफ्रुट्स (8 बादाम, 10, काजू आणि 5 अक्रोड) बारीक चिरून, १ टेबल स्पून तुपावर खमंग परतून घ्यावे आणि थंड करायला ठेवावे.

  2. 2

    आता त्याच कढईत भिजवलेला खजूर नरम होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवून घेऊन बाजूला ठेवावा.

  3. 3

    मग त्याच कढईत, २ टेबल स्पून तुप गरम करून, १ कप बाजरीचे पीठ मध्यम आचेवर ६-८ मिनिटे खमंग परतावे.

  4. 4

    नंतर त्यात, शिजवलेला खजूर मिक्स करून ४-५ मिनिटे मऊ होईपर्यंत परतावे.

  5. 5

    आता वरील मिश्रणात, 1 टेबल स्पून कोको पाउडर, 1/2 टी स्पून सुंठ पाउडर आणि 1/2 टी स्पून वेलची पाउडर घालून मंद आचेवर शिजवून घ्यावे.

  6. 6

    आता गॅस बंद करून तयार मिश्रण बर्फाच्या साच्यांमधे २ तास सेट करायला ठेवावे.
    २ तासांनंतर बर्फी सेट झाल्यावर ड्रायफ्रुट्स गार्निश करून सर्व्ह करावी.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Vartak Mohite
रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes