ओल्या नारळाची पोळी

नुतन
नुतन @cook_19481592
पुणे

#tejashreeganesh

पुरणपोळी ला पर्याय म्हणून ओल्या नारळाची पोळी.
महाराष्ट्र मदे प्रत्येक सणावाराला पुरणपोळी करण्याची प्रथा असते पण प्रत्येक वेळी ते करणे शक्य होत नाही. किंवा काही महिलांना नोकरी मुळे शक्य होत नाही. म्हणूनच पुरणपोळी ला पर्याय म्हणून ओल्या नारळाची पोळी.

ओल्या नारळाची पोळी

#tejashreeganesh

पुरणपोळी ला पर्याय म्हणून ओल्या नारळाची पोळी.
महाराष्ट्र मदे प्रत्येक सणावाराला पुरणपोळी करण्याची प्रथा असते पण प्रत्येक वेळी ते करणे शक्य होत नाही. किंवा काही महिलांना नोकरी मुळे शक्य होत नाही. म्हणूनच पुरणपोळी ला पर्याय म्हणून ओल्या नारळाची पोळी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1वाटी साखर
  2. चिमूटभरवेलदोड्याची पूड
  3. चिमूटभरजायफळाची पूड
  4. 1वाटी गव्हाचे पीठ
  5. 1वाटी किसलेलं ओले खोबरे
  6. चमचाभर मैदा
  7. 2पळी साजूक तूप
  8. चिमूटभरमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कढई मदे पळी भर साजूक तूप घेतले आणि त्यात किसलेलं ओल खोबरं घालून परतून घेतलं.

  2. 2

    परतले खोबरं थोडंसं गुलाबी सर झालं कि त्यात 1 वाटी साखर, वेलदोडा पूड, जायफळ पूड घालून पुन्हा थोडंसं परतून घेतलं.

  3. 3

    आता थोडंसं ओलसरपणा यईल आणि घट्ट पणा येऊ लागला कि गॅस बंद केला. इथे पोळीतलं सारण तयार झालं

  4. 4

    सारण थंड होऊ पर्यंत कणिक भिजवून घेतली. गव्हाचे पीठ, मैदा, चिमूटभर मीठ, तेल घालून कणिक मळून घेतली. पुरण प्रमाणे तयार केलेले सारण घालून पोळी लाटली व साजूक तूप टाकून भाजली.

  5. 5

    ओल्या नारळाची पोळी तयार झाली. वाढताना त्यावर साजूक तूप टाकून वाढावी.

  6. 6

    पोळी वर तोंडी लावायला लोणच्याचा खार बनऊन त्यात कैरी ऐवजी ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घातले.

  7. 7

    ओल्या नारळाची पोळी आणि नारळाचे लोणचे तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नुतन
नुतन @cook_19481592
रोजी
पुणे

Similar Recipes