रव्याचे उकडीचे मोदक

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#goldenapron3
#week4
#रवा
आपण बाप्पाला उकडीचे मोदक सहसा तांदळाच्या पिठाचे बनवितो. पण ते उकड व्यवस्थित झाली नाही तर कडक होतात. रव्याच्या उकडीचे मोदक दुसऱ्या दिवशीपर्यंत राहिले तरी कडक होत नाहीत म्हणून शक्यतो मी राव्याचेच बनविते. चवीलाही छान मऊ लुसलुशीत होतात. तुम्ही ही बघा करून......

रव्याचे उकडीचे मोदक

#goldenapron3
#week4
#रवा
आपण बाप्पाला उकडीचे मोदक सहसा तांदळाच्या पिठाचे बनवितो. पण ते उकड व्यवस्थित झाली नाही तर कडक होतात. रव्याच्या उकडीचे मोदक दुसऱ्या दिवशीपर्यंत राहिले तरी कडक होत नाहीत म्हणून शक्यतो मी राव्याचेच बनविते. चवीलाही छान मऊ लुसलुशीत होतात. तुम्ही ही बघा करून......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

शिजवायचे १० मिनिटे
५-६
  1. सारणासाठी
  2. २ वाट्या ओले खोबरे
  3. १ वाटी गुळ
  4. १ टिस्पून खसखस
  5. १/४ टि स्पून वेलचीपूड
  6. पारीसाठी
  7. १ मोठी वाटीबारीक रवा
  8. १-१/२ वाट्यापाणी
  9. मीठ चवीनुसार
  10. १ + २ टि स्पून तुप

कुकिंग सूचना

शिजवायचे १० मिनिटे
  1. 1

    मायक्रोवेव्ह मध्ये पहिलं खसखस गरम केली नंतर त्यात गुळ खोबरं टाकून ५ मिनिटे शिजवले.

  2. 2

    वेलचीपूड घालून मिक्स केले.

  3. 3

    भांड्यात पाणी गरम करायला ठेवून त्यात मीठ, तूप, दूध घातले आणि उकळी काढली.

  4. 4

    उकळी आल्यावर त्यात रवा टाकून ढवळा. झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ येऊ द्या. हाताला मऊसर लागेल पीठ

  5. 5

    परातीत काढा आणि पेल्याला तूप लावून त्याने रगडा म्हणजे गुठळ्या मोडल्या जातील. हाताला तूप लावून मळून घ्या.

  6. 6

    मळलेल्या पिठाचे गोळे करा. गोळीची पारी करून त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या.

  7. 7

    वाफवायला ठेवताना पाण्यात बुडवून मग चाळणीवर मोदक ठेवा. १० मिनिटे वाफवून घ्या.

  8. 8

    थंड झाल्यावर काढा. मस्त बाप्पाला नैवेद्य दाखवा रव्याचे उकडीचे मोदक तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes