उकडीचे जास्वंद मोदक (Ukadiche Jaswand Modak Recipe In Marathi)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103

#gur
गणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी एक नवीन पाककृती जास्वंद मोदक तयार केले आहे.

उकडीचे जास्वंद मोदक (Ukadiche Jaswand Modak Recipe In Marathi)

#gur
गणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी एक नवीन पाककृती जास्वंद मोदक तयार केले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मि.
4 सर्व्हिंग्ज
  1. उकड साहित्य -
  2. 2 कपबासमती तांदूळ पीठ
  3. 2 टीस्पूनमैदा
  4. 2 टीस्पूनतेल
  5. 1चिमुटभर मीठ
  6. केशरी
  7. हिरवा
  8. पिवळ फुड कलर
  9. सारण साहित्य -
  10. 2 कपखोबऱ्याचा चव
  11. 1 1/2 कप गुळ
  12. 1 टीस्पूनजायफळ पावडर
  13. 3 टीस्पूनभाजलेली खसखस
  14. 1 टीस्पूनसाजूक तूप

कुकिंग सूचना

45 मि.
  1. 1

    एका कढईत खसखस भाजून त्यात खोबऱ्याचा चव व गुळ घालून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात जायफळ पूड घालून परतून घ्यावे.

  2. 2

    तांदूळ पीठ व मैदा चाळून घ्यावा. एका भांड्यात 2+1/4 कप पाणी घालून त्यात मीठ व तेल घालून एक उकळी आणून त्यात तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करावे व 2 मि. झाकून ठेवावे. आता गॅस बंद करून मिश्रण थोडे कोमट करावे.

  3. 3

    आता थोडी उकड घेऊन चांगली मळावी. मळताना त्यात आवश्यक ते फुड कलर घालून मळावे. आता केशरी उकडीचा छोटा गोळा घेऊन त्याची पातळ आशी हाताने वाटी करून त्यात सारण भरून ती बंद करावी.

  4. 4

    सारण भरलेला गोळा चपटा करून त्याचे सुरी च्या साह्याने पाच समान हलक्या रेषा काढून घ्यावा. पुढील भाग बोटाने चपटा करून पाकळ्याचा आकार देणे.

  5. 5

    हातावर थोडी केशरी उकड घेऊन ती वळून त्यावर थोडी पिवळी उकडीने वळणे.हा पराग जास्वंद फुलामधे हलके होल करून त्यात रोवणे. हिरवी उकड हाताने पातळ पानाच्या आकारात करून त्यावर पानांच्या रेषा सुरीच्या साह्याने हलक्या पाडाव्या.

  6. 6

    स्टिमर मधे पाणी घालून त्यावर चाळणी ठेऊन त्यात तयार मोदक व पाने ठेऊन 15 मि. वाफवून घ्यावे.

  7. 7

    जास्वंद मोदकावर साजूक तूप घालून गणपती बाप्पा ला नैवेद्य दाखवून पटकन गडप करावा. ☺

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
रोजी
follow me on instagramhttps://www.instagram.com/invites/contact/?i=1sooz9w80xnvo&utm_content=fkll408To follow my recipe photos and videoshttps://youtube.com/@aryaparadkar7350?feature=sharedplease like share comment and subscribe to my channel🙏 🌹
पुढे वाचा

Similar Recipes