उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#रेसिपीबुक #week10 #मोदक
घरोघरी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व बाप्पाचा आवडता मोदकही करतात
मी पण आज तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले चला तुम्हाला दाखवते.

उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10 #मोदक
घरोघरी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व बाप्पाचा आवडता मोदकही करतात
मी पण आज तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले चला तुम्हाला दाखवते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
२-४ व्यक्ति साठ
  1. २०० ग्रॉम तांदळाची पिठी
  2. १०० ग्रॉम दुध
  3. १०० ग्रॉम पाणी
  4. 1टिस्पून तुप
  5. चविनुसार मिठ
  6. 2पिंच केसरी रंग
  7. 2पिंच हिरवा रंग
  8. 2टिस्पुन तुप किंवी तेल
  9. सारणाचे साहित्य
  10. २०० ग्रॉम खोवलेला नारळ
  11. १०० ग्रॉम किसलेला गुळ
  12. 1टेबलस्पुन खसखस
  13. 2टेबलस्पुन ड्रायफ्रुटचे काप
  14. 1टिस्पुन तुप
  15. चविनुसार मिठ
  16. 1टिस्पुन वेलची पावडर

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    कढईत तुप गरम झाल्यावर खसखस परतुन घ्या त्यातच खोवलेले खोबर परतुन घ्या व नंतर किसलेला गुळ ड्रायफ्रुटचे काप टाकुन गुळ वितळे पर्यत परता.

  2. 2

    त्यात मिल्क पावडर टाकुन परता नंतर वेलची पावडर मिक्स करा व सारण थोड घट्ट होईपर्यत परतत शिजवावं काढुन थंड करा.

  3. 3

    कढईत दुध पाणी तुप थोड मिठ टाकुन १ उकळी काढा उकळी आल्यावर थोडी थोडी तांदळाची पिठी टाकत चमच्याने ढवळत रहा लगेच गॅस बंद करून झाकण ठेवा १०-१५ मिनटे नंतर गरम गरम उकड तेल तुप लावुन हाताने मळुन घ्या.

  4. 4

    मळलेल्या पिठाचे ३ समान गोळे करा ऐका गोळ्यात केसरी दुसऱ्या गोळयात हिरवा रंग मिक्स करा ऐक गोळा सफेदच ठेवा.

  5. 5

    प्रत्येक पिठाचे साच्यात टाकुन सारण भरून मोदक करा व १०-१५ मिनटे वाफवुन घ्या.

  6. 6

    आपले कलरफुल उकडीचे मोदक रेडी प्लेटमध्ये डेकोरेट करून गणपती बाप्पासमोर नैवेद्य ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (6)

Similar Recipes