पडवळ, काळा वाटाणा रस्सा भाजी

#लॉकडाउनरेसिपीस
#डे १६
या लॉकडाउन मुळे भाज्या तर मिळतात पण त्या खाऊनच आता कंटाळा आलाय मग भाज्यांचे वेगवेगळे प्रकार करावे लागतात. तशीच आज मी पडवळ काळे वाटाणे घालून रस्सा भाजी केली. तसं भिजवलेली चणाडाळ, हिरवी मिरची घालून पण छान लागते ही भाजी पण थोडं वेगळं म्हणून मी आज काळे वाटाणे घालून केली तशीच चवळी घालुन किंवा सोललेले वाल घालूनही करता येते. तुम्हीही अशी वेगवेगळ्या प्रकारे करून बघा भाजी.....आणि हा मी तुम्हाला पडवळच्या बियांचा पोळाही करून दाखवणार आहे पण ती रेसिपी अलग लिहिणार आहे.
पडवळ, काळा वाटाणा रस्सा भाजी
#लॉकडाउनरेसिपीस
#डे १६
या लॉकडाउन मुळे भाज्या तर मिळतात पण त्या खाऊनच आता कंटाळा आलाय मग भाज्यांचे वेगवेगळे प्रकार करावे लागतात. तशीच आज मी पडवळ काळे वाटाणे घालून रस्सा भाजी केली. तसं भिजवलेली चणाडाळ, हिरवी मिरची घालून पण छान लागते ही भाजी पण थोडं वेगळं म्हणून मी आज काळे वाटाणे घालून केली तशीच चवळी घालुन किंवा सोललेले वाल घालूनही करता येते. तुम्हीही अशी वेगवेगळ्या प्रकारे करून बघा भाजी.....आणि हा मी तुम्हाला पडवळच्या बियांचा पोळाही करून दाखवणार आहे पण ती रेसिपी अलग लिहिणार आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भिजवलेले काळे वाटाणे कुकरमध्ये शिजवून घ्या.
- 2
कढईत तेलात कांदा, टोमॅटो, हिंग घालून परता मग त्यात आलं लसूण पेस्ट, हळद, मालवणी मसाला घालून परता
- 3
आता त्यात बिया काढून चिरलेले पडवळ घाला थोडं पाणी घालून झाकण ठेवून अर्धवट शिजवा
- 4
नंतर त्यात वाटण, शिजवलेले काळे वाटाणे घालून झाकण ठेवून शिजवा. चपाती भाताबरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काळ्या वाटाण्याची उसळ
#फोटोग्राफी#उसळकोकणातली ही काळ्या वाटाण्याची उसळ आणि वडे किंवा आंबोळ्या अतिशय प्रसिद्ध अशी डिश आहे. त्यात काजू घालून केली तर सोने पे सुहागा.... कोकणात चिकनमध्ये किंवा काळ्या वाटाण्याच्या उसळीत काजुगर घालून आम्हाला आवडतात म्हणून आमची आजी बनवायची. आजी ओले काजू उन्हात सुकवून ठेवायची आणि आम्ही मे महिन्यात गावाला गेलो की पदार्थ करून घालायची आणि येताना गुपचूप तांदळाच्या पिठात किंवा तांदळात घालून काजूगर द्यायची.सध्या लॉकडाउन असल्यामुळे काही आणायला मिळत नाही त्यामुळे आहे त्यात सर्व निभावून घेत आहोत. काजूगर अगोदर आणलेले होते तेच वापरलेत. Deepa Gad -
भरलं वांग
#लॉकडाउनरेसिपीस#डे७लॉकडाउन असल्यामुळे जोपर्यंत भाज्या मिळतात तोपर्यंत एकदम ५-६ भाज्या आणून ठेवल्या की एक आठवडा बघायला नको फक्त त्या व्यवस्थित पेपरात गुंडाळून प्लास्टिक बॅग मध्ये ठेवल्या की खराब होत नाहीत. तर आज मी भरलं वांग केलं आहे. Deepa Gad -
पडवळ-वाल भाजी (PARWAL WAAL BHAJI RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24# Snakegourdपडवळाची भाजी वाल घालून खूपच खमंग लागते. गणपतीच्या नैवेद्याच्या ताटात ह्या भाजीला मानाचे स्थान आहे. तांदळाच्या मऊ लुसलुशीत भाकरी सोबत पडवळ-वाल भाजी मस्त लागते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
पडवळ चणाडाळ भाजी (parwal chana dal bhaji recipe in marathi)
# पडवळ ही भाजी बरेच जण खात नाहीत. माझ्या माहेरी पण ही भाजी खात नाहीत. लग्न झाल्यावर ही भाजी मला सासूबाईंनी शिकवली. आता नेहमी वेगवेगळ्या प्रकारची बनवते. कधी वाल घालून, कधी बेसन पेरून तर कधी चणाडाळ घालून. पाहुया कशी केली ते. Shama Mangale -
वांगी सुका जवला भाजी
#लॉकडाउनरेसिपीस#डे१९आज रविवार, खूप आठवण येतेय, मासे खायची इच्छा होतेय, लॉकडाउन मुळे मार्केट मध्ये मासे नाही मग काय.... सुक्या मच्छीचा आधार आणि काय... Deepa Gad -
-
पडवळ बेसन भाजी (parwal besan bhaji recipe in marathi)
#Seasonal_Vegetable#Cooksnap#पडवळ_बेसन_भाजी पडवळ चणाडाळ,पडवळ डाळिंब्या,भरले पडवळ,पडवळ बेसन ,पडवळ काचर्या,पडवळ कढी,यासारखे अनेक प्रकार आपल्याला पडवळापासून करता येतात..आज मी @savikaj_re1 Sanhita Kand यांची पडवळ बेसन ही भाजी cooksnap केली आहे..Sanhitaji पडवळ बेसन भाजी खूप छान खमंग झालीये..😋👌👍..Thank you so much for this wonderful recipe 😊🌹 Bhagyashree Lele -
फ्लॉवर, मटार रस्सा भाजी (flower mutter rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week24#cauliflowerआज मी फ्लॉवर, मटार, बटाटा, टोमॅटोची रस्सा भाजी बनविली. Deepa Gad -
पडवळ चणाडाळ भाजी (padwal chanadal bhaaji recipe in marathi)
#goldenapron3 24th week gourd ह्या की वर्ड साठी snake gourd ची म्हणजेच पडवळाची चणाडाळ घालून भाजी केली आहे. Preeti V. Salvi -
भरलेलं पडवळ
#लॉकडाऊन पाककृतीपडवळ ही भाजी नेहमी आहारात हवी कारण अन्नपचनाला मदत करून ऍसिडिटी सारखे आजार ती समूळ नष्ट करते.कधी बिरडे घालून(वाल, मूग),कधी डाळी घालून(मूग,चणा, मटकी), तर कधी नुसतीच मिरची कांद्यावर परतून कशीही केली तरी छान लागते.कधी,सुका जवळा, सुकट, सोडे नाहीरल ओली कोलंबी घालून केली तर भले भले न खाणारेही बोटे चाटत चट्टामट्टा करतात.पण आज मी तुम्हाला एक पार्टी डिश सांगणार आहे आणि तीही शाकाहारी.हमखास उत्तम होणारी आणि नंबर पटकावून जाणारी.घ्या तर साहीत्य जमवायला नूतन सावंत -
-
पडवळ वाल भाजी (Padval Val Bhaji Recipe In Marathi)
#SSR # श्रावण स्पेशल रेसिपीश्रावणात भरपूर वेल भाज्या येतात त्यात पडवळ. ह्यात भिजवलेले वाल घालून ही भाजी खुप मस्त होते.श्रवणातले उपवास सोडताना अशा भाज्या बनवतात आणि त्या फक्त्त श्रावणतच छान लागतात. Shama Mangale -
पडवळ पनीर भाजी (padwal paneer bhaji recipe in marathi)
#GA4#week24#snakeguard#पडवळपनीरभाजीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये snakeguard हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पडवळ कट करताना थोडे लांब काकडी सारखे , घोसाळे सारखा दोडके यांसारखा दुधी सारखा असे संमिश्र अशा भाज्यांची कॉलिटी मला त्यात दिसत होती ही रेसिपी मी स्वतः क्रीएट करून तयार केली आहे. मी माझ्या पॉटलक पार्टीत माझ्या एका तमिळ फ्रेंड ने आणली होती चणाडाळ खोबरे टाकून तेव्हा मी ही भाजी खाल्ली होती.आमच्याकडे ही भाजी खाल्ली जात नसल्यामुळे कधी तयारच केली नाही आणि आता हा कीवर्ड बघून माझ्यासाठी एक चॅलेंज होते की घरच्यांना तर ही भाजी खाऊ घालायची आहे बनवली तर आवडलीच पाहिजे त्यामुळे मी असा घटक वापरला ज्यामुळे ही भाजी सगळे खातील. आणि तसेच झाले भाजी खरंच त्या घटकांमुळे भाजीला चवही छान आली आणि मी पहिल्यांदा हि भाजी तयार केली मलाही आणि घरच्यांनाही खूप आवडलीरेसिपी सक्सेस झाली असे म्हणता येईल.तर बघूया पडवळ ही भाजी पनीर घालून कशी तयार केली Chetana Bhojak -
भरलेले कारले
#लॉकडाउन रेसिपीस#डे२०हे भरलेले कारले भरली वांगी प्रमाणेच करायची फक्त पहिली कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहेत. त्यामुळे कारल्याचा कडूपणा थोडा कमी होतो, जास्त कडू लागत असेल तर थोडी साखर हवी असल्यास टाकू शकता. Deepa Gad -
झणझणीत वाटाणा चवळी रस्सा (vatana chavli rassa recipe in marathi)
#KS4-#खान्देश - खान्देशच्या लोकांना तिखट खाण्याची सवय असते.रोजचे जेवणसुद्धा इतरांपेक्षा जास्त प्रमाणात तिखट असते, तेव्हा आज मी तशीच भाजी केली आहे. Shital Patil -
वाटाणा-बटाटा रस्सा भाजी
#lockdown recipe day 4लाॅकडाऊनचा आजचा चौथा दिवस आहे. आणि अजून १७ दिवस बाकी आहेत. आणि ते आपण सर्वांनी घराबाहेर न पडता आपापल्या घरात सुरक्षित राहूनच काढायचे आहेत. खरं तर काही जणांना घरात राहून कदाचित कंटाळा पण आला असेल, पण त्याला काही इलाज नाही. सर्वांच्याच भल्यासाठी घरातच रहाणे आवश्यक आहे. आणि घरात राहिल्यावर जे काही खाण्याचे सामान शिल्लक आहे त्यातले पुरवून वापरले पाहिजे. माझ्या कडे फ्रिजरमधे फ्रोजन वाटाणे होते त्यातले थोडे घेऊन त्यात ४ बटाटे घालून मिक्स अशी ग्रेव्ही भाजी बनवली. ती भाजी चपाती आणि भात दोन्ही बरोबर पण खाता आली. Ujwala Rangnekar -
सिझनल भाज्या पडवळ-कडव्या वालाची भाजी (padwal valachi bhaji recipe in marathi)
पडवळ ही एक वेलवर्गीय भाजी..पण कोकणात आणि कायस्थांमध्ये ही भाजी जास्त केली जाते.पावसाळ्यात पडवळासारखी पचनास हलकी भाजी नेहमी खावी.कारण तिच्यात भरपूर फायबर्स व खनिजे आढळतात.त्वचाविकार आणि मधुमेह यावर ही भाजी गुणकारी आहे.अनेकांच्या नावडतीची भाजी म्हणजे पडवळ. अनेकांच्या घरात पडवळ ही भाजी वर्ज्यच आहे. पडवळ हे नाव जरी काढलं तरी अनेक जण तोंड वेडवाकडं करतात. परंतु अनेकांच्या नावडतीच्या या भाजीचे अनेक गुणधर्म आहेत. म्हणूनच तिच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पडवळमध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, तंतूमय व पिष्टमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे त्वचाविकारांवर पडवळ परिणामकारक आहे.ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे, किंवा ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत अशांनी नियमितपणे आहारात पडवळाचा समावेश केला पाहिजे. पडवळ खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.पडवळ जसा स्लिम ट्रीम आहे तसेच त्याचे गुणधर्मही आहेत.कधीतरी ही नावडती भाजी आवडती करुन खायला घालणे हेच गृहिणीचं कौशल्य😊👍 Sushama Y. Kulkarni -
चवळीची उसळ (chavdichi usal recipe in marathi)
#लंच#चवळीभाजीमी दर शनिवारी कुठल्या ना कुठल्या प्रकारची उसळ करतेच, तशी आज मी चवळीची उसळ बनविली आहे. मी भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण आठवडाभरासाठी करून ठेवते त्यामुळे कोणतीही उसळ करायची Deepa Gad -
नवलकोलची भाजी
#लॉकडाउनरेसिपीस#डे१५ नवलकोलची भाजी जास्त करून हिवाळ्यात मिळते. आज मला एका भाजीवालीकडे ही भाजी दिसली ती घेतली, मला तरी ही भाजी खुप आवडते. त्याच्या पाल्याची भाजी तुरीची डाळ घालून खुपच छान होते, माझ्या लेकीला ती खुपच आवडते. Deepa Gad -
दुधीची भाजी
#लॉकडाउनरेसिपीस#डे६आज मी दूधीची भाजी बनविली आहे, डायबिटीस असणाऱ्यांनी दुधीची भाजी खावी. माझ्या मुलीला आवडत नाही म्हणून तिच्यासाठी कोशिंबीर बनविली. Deepa Gad -
पडवळ भाजी (prawal bhaji recipe in marathi)
#GA4#week26#POINTED GOURDगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये POINTED GOURD (parwal) हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली.पडवळ ही भाजी तितकी आवडीची नाही. पण तिच्या आरोग्याला फायदे बघितले तर भरपूर आहेत.पडवळ मध्ये कॅल्शियम लोह, फॉस्फरस तंतुमय व पिष्टमय पदार्थ भरपूर आहे. बर्याच आजारांवर पडवळ खूप उपयोगी आहे म्हणून कितीही नावडती असली तरी आहारातून घेतलीच पाहिजे. थोडी काकडी सारखी दिसणारी थोडी तोडली सारखी दिसणारी ही भाजी तिची स्वतःची चव दिसण्यापेक्षा सगळ्यांपेक्षा वेगळी आहेमाझ्याकडे की भाजी इतक्या आवडीने खात नाही मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी एकही वस्तू आवडत नाही असे सांगत नाही कारण लहानपणापासून माझ्यात तसे टाकलेच आहे की काही आवडत नाही असं आहेच नाही कोणतीही वस्तू चाखून, टेस्ट करून बघितली पाहिजेअसे मला नेहमी शिकवलेले आहे त्यामुळे मी नवीन नवीन वस्तू बनवून आणि टेस्ट करून बघतेस.माझी एक फ्रेंड आहे तीही भाजी बनवते तेव्हा ती मला देते त्यात ती तूप करतानाचे शेवटचे कडलेले शेवटचे वेस्ट उरते ते ती या भाजीत टाकते खरच ते टाकल्यामुळे चव खूप छान लागते मी ही भाजी आजी बनवते त्या पद्धतीने तयार केली आहे.बघूया रेसिपी पडवळ कशी तयार केली Chetana Bhojak -
काळा वाटाणा भाजी (kala vatana bhaji recipe in marathi)
#cooksnapअंकिता रावते यांची रेसिपी फॉलो करून केली आहे. भाजी खूपच टेस्टी आणि छान झाली आहे. Jyoti Gawankar -
कडवे वाल पडवळ भाजी (kadve val padval bhaji recipe in marathi)
#ॠतू नुसार भाजी# ह्या ॠतू पडवळ भरपूर पिकते पचायला एकदम हलके पण खुप जण खात नाहीत म्हणून ही मिश्र भाजी केली जाते .अर्थात छान लागते . Hema Wane -
पडवळ बटाटा भाजी (padval batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week24#Snake Gourdया आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे (पडवळ). आज साधीच भाजी केली आहे, चला तर मग ही रेसिपी बघूया.बाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेत Bajra, Garlic, Chicken Soup, Cauliflower, Rasgulla Sampada Shrungarpure -
पडवळाची भाजी (Padwalachi bhaji rcecipe in marathi)
#GA4#week24#keyword_snakegourdपडवळाची भाजी चणाडाळ घालून केली छान लागते. मुद्दाम मी या भाजीत चणाडाळ जास्त टाकते, म्हणजे माझी मुलगी पण ही भाजी आवडीने खाते. Shilpa Ravindra Kulkarni -
चणा पडवळ भाजी (padwal bhaaji recipe in marathi)
#Goldenapron3 week24.तील की वर्ड स्नेक गौर्ड/पडवळ आहे. मला ही भाजी खूप आवडते. माझ्यासाठी मी ही आवर्जून बनवते. Sanhita Kand -
पडवळ चणाडाळ भाजी (Padwal Chanadal Bhaji Recipe In Marathi)
#BR2पडवळची भाजी घरातील सर्वांनाच आवडते. त्याचा एक विशिष्ट सुगंध असतो आणि मुख्य म्हणजे ती खूप प्रकारे करता येते. भरलेले पडवळ, पारंपारिक पडवळ वालाची भाजी, पडवळ टोमॅटो भाजी, पडवळ बेसन झुणका इ.ई. आज आपण बघूया चनाडा पडवळ याची चविष्ट भाजी. Anushri Pai -
शेंगा वाल बटाटा रस्सा भाजी (Shenga Val Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
मिक्स भाजी सगळ्यांच्याच आवडीची आज मी शेवग्याच्या शेंगा कडवे वाल, बटाटा भाजी केली खुपच टेस्टी झाली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
अंडा मसाला
#लॉकडाउनरेसिपीस#डे५आज रविवार असल्यामुळे नॉन व्हेज खायची सवय. त्याशिवाय रविवार वाटतच नाही, तर आज घरात अंडी आणलेली होती त्याची अंडा मसाला आणि भाकरी केली. Deepa Gad -
वाटाणा पनीर भाजी (Vatana Paneer Bhaji Recipe In Marathi)
गोल गोल हिरवे वाटाणे आणि त्यात पनीर पांढरे शुभ्र मस्त कॉम्बिनेशन आणि सर्वांनाआवडणारी ही भाजी.:-) Anjita Mahajan
More Recipes
टिप्पण्या