8 शोट्स स्क्वैयर पाणीपुरी

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#पाणीपुरी
(8 shots square panipuri)
मी रवा वापरुन चौकन पाणी पूरी केली.काही तरी वेगळे ,पण चव व पौष्टिकता दोन्ही लक्षात ठेऊनच...चवीला अतिशय सुरेख अशी ही पाणीपूरी नक्की बनुन बघा😊

8 शोट्स स्क्वैयर पाणीपुरी

#पाणीपुरी
(8 shots square panipuri)
मी रवा वापरुन चौकन पाणी पूरी केली.काही तरी वेगळे ,पण चव व पौष्टिकता दोन्ही लक्षात ठेऊनच...चवीला अतिशय सुरेख अशी ही पाणीपूरी नक्की बनुन बघा😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. पूरी साठी
  2. 100 ग्रामरवा (40 पूरया झाले)
  3. 3 टेबलस्पूनतेल
  4. गरम पाणी
  5. 8 शोट्स पाणी साठी
  6. 1 आंबट गोड चिंच खजूर पाणी साठी
  7. 50 ग्रामचिंच
  8. 25 ग्रामखजूर
  9. 25 ग्रामगुळ
  10. 1 टीस्पूनमीठ
  11. पुदीना पाणी साठी
  12. 4 टेबलस्पूनपुदीना
  13. 3 टेबलस्पूनकोथंबीर
  14. 3हिरव्या मिरच्या
  15. 1 इंचआले
  16. 1 टीस्पूनमीठ
  17. 1 टेबलस्पूनपाणीपुरी मसाला
  18. पान मसाला पाणी साठी
  19. 2 टेबलस्पूनपान मसाला सरबत
  20. 1 टेबलस्पूनपाणीपुरी मसाला
  21. पाणी
  22. खस पाणी साठी
  23. 2 टेबलस्पूनखस सरबत
  24. 1 टीस्पूनपाणीपुरी मसाला
  25. पाणी
  26. 5टॉमेटो पाणी
  27. 2 टेबलस्पूनटॉमेटो केचप
  28. 2 टेबलस्पूनचिली सॉस
  29. 1 टेबलस्पूनचिंच चटनी
  30. 1 टीस्पूनपाणी पूरी मसाला
  31. पाणी
  32. शेवगा पाणी
  33. 100 ग्रामशेवगा च्या शेंगा
  34. 2 टेबलस्पूनहिरव्या मिरच्या व लसूण पेस्ट
  35. 1 टीस्पूनमीठ
  36. 1 टेबलस्पूनपाणी पुरी मसाला
  37. 1 टीस्पूनपाणी पूरी मसाला
  38. बिट व कोकम पाणी
  39. 50 ग्रामबीट
  40. 2 टेबलस्पूनकोकम सरबत
  41. 1 टीस्पूनपाणी पूरी मसाला
  42. पाणी
  43. 8लींबू पाणी
  44. 2 टेबलस्पूनलींबू रस
  45. 1 टीस्पूनसाखर
  46. 1 टीस्पूनमीठ
  47. 1 टीस्पूनपाणी पुरी मसाला
  48. सारण मसाला साठी
  49. 150 ग्रामबटाटे
  50. 100 ग्राममोड आलेली मग
  51. 2 टेबलस्पूनतिखट
  52. 1 टेबलस्पूनमीठ
  53. 1 टीस्पूनजीरे पावडर
  54. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    पुरी साठी रवा,तेल लाऊन एकजीव करावे व थोडे थोडे पाणी घालून गरम पाणी घालून कणीक भीजवणे व 10मिनिटे झाकण ठेवावे

  2. 2

    कणकेचा गोळा घेऊन पोळी लाटून घ्यावी व चौकोन मोल्ड वापरुन पुरी तयार करून घ्यावे व तेलात खरपूस तळून घ्यावे

  3. 3

    सारण करता..बटाटे उकडून घ्यावेत व मोड आलेले मुग,तिखट मीठ,जीरे पावडर घालून चांगले मिश्रण एकजीव करावे

  4. 4

    गोड पाणी साठी..चिच,खजूर व गुळ एकत्र भीजवणे व मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करावे व मीठ घालून आंबट गोड पाणी तयार करून घ्यावे

  5. 5

    पुदीना पाणी साठि..पुदीना,कोथिंबीर,हिरव्या मिरच्या व आले एकत्र करुन घ्यावे व थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे..मिठ व पाणी पूरी मसाला घालून पाणी तयार करून घ्यावे

  6. 6

    खस,पान मसाला,कोकम सरबत ग्लास मधे घ्यावे व त्यात पाणी पुरी मसाला व मीठ घालून पाणी तयार करून घ्यावे

  7. 7

    टॉमेटो साठी.टॉमेटो केचप,चिली सॉस व चिंच चटणी एकत्र करुन घ्यावे व पाणी तयार करून घ्यावे

  8. 8

    शेवगा साठी. शेंगा शिजवावे व त्याचा गर काडून घ्यावे व त्यात हिरव्या मिरच्या व लसूण पेस्ट घाला पाणी तयार करून घ्यावे

  9. 9

    बिट साठी..बीट,हिरव्या मिरच्या व लसूण पेस्ट घ्यावे व मिक्सर मधून फिरवून घ्यावे व पाणी व मसाला घालून पाणी तयार करून घ्यावे

  10. 10

    बिट व कोकम पाणी एकत्र करुन घ्यावे व सगळे तयार पानी वेगळे छोटे बाउल मध्ये भरून घ्यावे

  11. 11

    तयार पुरी मध्ये सारण भरुन पाणी सोबत खायला ध्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes