रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास पुऱ्या झाल्यानंतर
५ प्लेट
  1. 1 वाटीपुर्यांसाठी बारीक रवा
  2. 1 चमचातांदूळ पीठ
  3. चिमुटभर सोडा
  4. मीठ
  5. १/२ चमचाबुंदी साठी डाळीचे पीठ
  6. 1/2 वाटीतांदूळ पीठ
  7. 1 चिमूट हळ द
  8. मीठ
  9. गोड पाण्यासाठी
  10. 2 बटुक चिंच
  11. 4-5खजूर
  12. 2 चमचेगूळ
  13. तिखट पाण्यासाठी
  14. २०-२५ पाने पुदिना
  15. 2मोठ्या मिरच्या
  16. शेंडेलोन
  17. पादेलोन
  18. मीठ
  19. 3-4उकडलेले बटाटे
  20. मीठ

कुकिंग सूचना

१ तास पुऱ्या झाल्यानंतर
  1. 1

    पुर्यांची कृती: सर्वात आधी साखर पाण्यात विरघळवून घ्यायचे. नंतर रवा, तांदूळ पीठ, चवीनुसार मीठ, सोडा आणि साखरेचे पाणी एकत्र करून घट्ट मळवे. हे २ तास भिजवून ठेवावे. साखरेच्या पाण्याने पुऱ्या छान कुरकुरीत होतात. नंतर खूप जाड किंवा पातळ ना लाटता मोठी पोळी करावी. छोट्या वाटीने पुर्यांना आकार द्यावा. तेल मंद आचेवर तापत ठेवावे. ते तापल्यावर त्यात मावतील आणि फुल्ल्यावर जागा राहील इतक्या पुऱ्या त्यात सोडाव्यात आणि मंद आचेवर तळव्यात.

  2. 2

    बुंदी कृती: डाळीचे पीठ, तांदूळ पीठ, हळद, मीठ, तिखट बुंदी पडेल इतके सैलसर भिजवावे पण भजी इतके सैल नसावे. तेल तापत ठेऊन झऱ्यावर हे पीठ घेऊन गोल दिशेत फिरवून मंद आचेवर तळून घ्याव्यात.

  3. 3

    गोड पाणी: चिंच, खजूर आणि गूळ एकत्र १ तास आधी भिजत घालावे. जितके घट्टा हवे त्याप्रमाणे पाणी घालावे. नंतर मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.

  4. 4

    तिखट पाणी: पुदिना, मिरच मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. नंतर एका भांड्यात काढून त्यात शेंदेलोन, पदेलोन, मीठ घालावे आणि नीट हलवावे.

  5. 5

    बटाटे उकडून हातानेच बारीक करावेत आणि त्यात मीठ, किंचित तिखट, आणि हवा असल्यास चात मसाला घालावा.

  6. 6

    ताटात देताना: एका पुरीमध्ये बटाटा, गोड पाणी, बुंदी घातलेले तिखट पाणी असे एकत्र करून द्यावे. आवडत असल्यास त्यात बारीक कांदा देखील घालता येईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Harshada Ananda Babrekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes