चिकन ६५ (chicken 65 recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

#फॅमिली
चटकदार रेसीपी बनवण्याच्या आवडीमधून अनेक चविष्ट पाककृती उपजल्या आणि त्यापैकी "चिकन ६५" हि माझ्या घरच्यांना खास आवडणारी रेसीपी, विशेषतः माझ्या husband ची.... मी बनवलेल्या रेसीपीज् पैकी one of the favourite recipes!
आज मी हि Spicy रेसीपी डेडीकेट करते आहे
To my loving sweet heart, my Husband "Mr. Amol Mohite. 🥰😍😍👍🏽
विशेष नोंद:
जर तुम्हाला चिकन आवडत नसेल तर हि रेसीपी तुम्ही चिकन ऐवजी बोनलेस मटण तुकडे, पनीर, मशरुम, फ्लाॅवरचे तुरे, बटाटा आणि उकडलेल्या अंड्याचा सफेद भाग वापरुनही याच पध्दतीने बनवू शकता. 😊👍🏽 (©Supriya Vartak-Mohite)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

साधारणतः २०-२५ मिनीटे
४-५ जणांसाठी करता येईल
  1. ५०० ग्रॅम बोनलेस चिकनचे तुकडे
  2. 2 टि स्पून आलं लसूण पेस्ट
  3. 3 टि स्पून लाल मिरची पावडर
  4. 1 टि स्पून गरम मसाला
  5. 1/2 टि स्पून काळीमिरी पावडर
  6. 1/4 कपबेसन
  7. 1 टि स्पूनकॉर्न फ्लोअर
  8. 1 टि स्पून तांदळाचे पीठ
  9. 5-6हिरव्या मिरच्या
  10. 7-8उभ्या बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या
  11. 1 टि स्पून सोया साॅस
  12. 2 टि स्पून केचप (एछ्चिक)
  13. 1 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  14. तळण्यासाठी तेल
  15. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

साधारणतः २०-२५ मिनीटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यात चिकनचे तुकडे घेऊन त्यात आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, गरम मसाला, बेसन, तांदळाचे पीठ, corn flour आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मॅरेनेट करावे (१५ मिनीटे). नंतर कढईमधे तेल चांगले गरम करुन त्यात मॅरेनेट केलेले चिकनचे तुकडे छान खरपूस तळून घ्यावे.

  2. 2

    आता एका पॅनमधे २ चमचे तेल गरम करावे
    मग त्यात उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या घालून चांगले परतून घेणे, नंतर त्यात काळीमिरी पावडर, सोया साॅस व केचप घालून परतून मग त्यावर चिकनचे तळलेले तुकडे घालून चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    आता परतून झालेले चिकनचे तुकडे एका प्लेट मधे काढून त्याच्या वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झणझणीत चिकन ६५ डिश तयार करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Vartak Mohite
रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

Similar Recipes