चिकन करी (chicken curry recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#pcr प्रेशर कुकर रेसिपीज कॉन्टेस्ट मध्ये मी "चिकन करी" हि पाककृती सबमिट करत आहे :)

चिकन करी (chicken curry recipe in marathi)

#pcr प्रेशर कुकर रेसिपीज कॉन्टेस्ट मध्ये मी "चिकन करी" हि पाककृती सबमिट करत आहे :)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१- दीड तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोसाफ केलेले चिकन चे तुकडे
  2. 3लिंबू
  3. 4 चमचालाल तिखट मसाला
  4. 2 चमचाबिर्याणी / चिकन मसाला
  5. 1 चमचाहळद पावडर
  6. 2 चमचाधने पाउडर
  7. 2 चमचाजीरे पाउडर
  8. 2 चमचागरम मसाला
  9. 2मोठे कांदे
  10. 1मोठा टोमॅटो
  11. १२-१५ लसूण
  12. 2 इंचआलं
  13. 1 वाटीकिसलेलं सुकं खोबरं
  14. 1 वाटीचिरलेली कोथिंबीर
  15. 1 चमचाकाळे / पांढरे तीळ
  16. 5-6कढीपत्ता पाने
  17. 1लाल सुकी / बेडगी मिरची
  18. 1 चमचाबडीशेप
  19. 1 चमचाधणे
  20. खाद्यतेल
  21. 1वेलची
  22. 3-4काळीमिरी
  23. 4-5लवंगा
  24. 1 इंचदालचिनी तुकडा
  25. चवीपुरतं मीठ

कुकिंग सूचना

१- दीड तास
  1. 1

    अर्धा किलो साफ केलेले चिकन चे तुकडे ३-४ वेळा स्वछ पाण्यातून धुवून घेतले. त्यात एक लिंबाचा रस पिळून घातला. २ चमचा लाल तिखट मसाला, १ चमचा बिर्याणी / चिकन मसाला,अर्धा चमचा हळद पावडर, १ चमचा धने पाउडर, १ चमचा जीरे पाउडर, १ चमचा गरम मसाला चिकन ला चोपडून घेतला. हे चिकन फ्रीज मध्ये overnight मॅरीनेट करत ठेवलं.

  2. 2

    १ कांदा उभा कापून घेतला, आणि दुसरा कांदा बारीक चिरून घेतला. टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून ठेवली. लसूण पाकळ्या आणि आल्याचे बारीक तुकडे करून घेतले.

  3. 3

    कूकर गरम करून त्यात तेल तापायला ठेवलं. तेल तापलं कि त्यात कांदा तळून घेतला. १ चमचा काळे / पांढरे तीळ घातले. तळताना थोडं मीठ घातलं त्यामुळे कांदा कुरकुरीत होतो.

  4. 4

    तळलेला कांदा बाजूला काढून घेतला. त्यातच कुकर मध्ये पुन्हा थोडं तेल तापवून ५-६ कढीपत्ता पाने, १ लाल सुकी / बेडगी मिरची, १ चमचा बडीशेप, १ चमचा धणे, १ वेलची, ३-४ काळीमिरी, ४-५ लवंगा, १ इंच दालचिनी तुकडा घालून परतून घेतलं. खाद्य मसाल्याचा सुंगंध दरवळला कि त्यात कापलेल्या लसूण पाकळ्या आणि आलं परतून घेतलं.

  5. 5

    बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेतला. कांदा मऊ पडून गुलाबीसर होईपर्यत शिजू दिला.

  6. 6

    कांदा शिजला कि चिरलेला टोमॅटो घातला, तो मऊ पडेपर्यन्त मिश्रण शिजू दिल.

  7. 7

    किसलेलं खोबर घातलं. १ चमचा मीठ टाकून मिश्रण एकजीव केलं.

  8. 8

    गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ दिलं. थंड झालेल्या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स केली.

  9. 9

    हे मिश्रण मिक्सर ला लावून बारीक वाटण करून घेतलं.

  10. 10

    कुकर मध्ये पुन्हा २ चमचे तेल तापत ठेवलं. त्यात वाटण घातलं. अर्धी वाटी पाणी घालून मिक्सर मधलं सगळं वाटण कुकर मध्ये घेतलं. वाटण थोडं उकळायला लागलं कि त्यात २ चमचा लाल तिखट मसाला, १ चमचा बिर्याणी / चिकन मसाला,अर्धा चमचा हळद पावडर, १ चमचा धने पाउडर, १ चमचा जीरे पाउडर टाकलं. आणि झाकण ठेवून एक उकळी येऊ दिली.

  11. 11

    मिश्रण उकळलं कि त्यात रात्रभर मॅरीनेट केलेलं चिकन घातलं. पाऊण - एक ग्लास पाणी घातलं. एक उकळी आली कि त्यात १ चमचा गरम मसाला टाकला. आणि कुकर बंद करून ३ शिट्या काढल्या.

  12. 12

    कुकर थंड झाला कि मिठाचं प्रमाण चाखून पाहायचं. गरज असल्यास मीठ टाकायचं. परत एक चिकन ला उकळी काढायची.

  13. 13

    रेस्टॉरंट मधलं चिकन आतून शिजलेलं नसतं.
    पण असं कुकर मध्ये चिकन छान शिजून, मसाला सुद्धा चांगला मुरलेला असतो.
    असं हे प्रेशर कुकर मध्ये शिजवलेलं चिकन खायला तयार. :)
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

Similar Recipes