मिनी लंच विथ स्वीट (mini lunch recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#फॅमिली
आमच्या फॅमिली साठी सगळ्यात आवडता मेनू काय तर वरण, भात ,भाजी ,पोळी आणि एखादा गोड पदार्थ...मग मी त्यातल्या त्यात मुलीच्या आवडीचा म्हणजे बासुंदी ,पूरी,बटाट्याची भाजी, साधं वरण,भात,पापड,चटणी असा बेत केला. फॅमिली डे निमित्त छोटासा पण छान बेत झाला.

मिनी लंच विथ स्वीट (mini lunch recipe in marathi)

#फॅमिली
आमच्या फॅमिली साठी सगळ्यात आवडता मेनू काय तर वरण, भात ,भाजी ,पोळी आणि एखादा गोड पदार्थ...मग मी त्यातल्या त्यात मुलीच्या आवडीचा म्हणजे बासुंदी ,पूरी,बटाट्याची भाजी, साधं वरण,भात,पापड,चटणी असा बेत केला. फॅमिली डे निमित्त छोटासा पण छान बेत झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३-४ व्यक्तींसाठी
  1. भात....
  2. 1 कपतांदूळ
  3. 2 कपपाणी
  4. वरण...
  5. 1/2 कपतुरडाळ
  6. 2 कपपाणी
  7. 1/4 टीस्पूनहिंग
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनगुळ
  10. 1/2 टीस्पूनमीठ
  11. भाजी..
  12. 5बटाटे..मध्यम आकाराचेे
  13. 2कांदे
  14. 2हिरव्या मिरच्या
  15. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  16. 1/2 टीस्पूनमीठ
  17. 1 टीस्पूनसाखर
  18. 2 टीस्पूनतेल
  19. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  20. चिमूटभरहिंग
  21. 1/4टिस्पून हळद
  22. 4-5कडीपत्ता पाने
  23. 1 टेबलस्पूनखोबरं
  24. बासुंदी..
  25. 1/2 लिटरदूध
  26. 3 टेबलस्पूनसाखर
  27. 1 टेबलस्पूनकाजू,बदाम,चारोळी
  28. 1/4 टीस्पूनवेलचीपूड
  29. पुरी...
  30. 1 कपगव्हाचे पीठ
  31. 1 टेबलस्पूनरवा
  32. 1/2 टीस्पूनसाखर
  33. 1/4 टीस्पूनमीठ
  34. तळण्यासाठी तेल
  35. चटणी...
  36. 1 कपखोबरं
  37. 2हिरव्या मिरच्या
  38. 1/4 कपकोथिंबीर
  39. 1/4 टीस्पूनमीठ
  40. 1 टीस्पूनसाखर
  41. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  42. इतर..
  43. 2मुगाचे पापड
  44. तळण्यासाठी तेल
  45. 1 टेबलस्पूनलोणचं,
  46. 1 टेबलस्पूनसाजुक तूप

कुकिंग सूचना

  1. 1

    तांदूळ धुवून,त्याचा कूकर मध्ये २ शिट्ट्यामध्ये भात शिजवून घेतला.त्याची मूद पाडून ठेवली.

  2. 2

    तुरडाळ कूकर मध्ये शिजवून,त्यात हळद,हिंग,मीठ,गुळ घालून छान घोटून उकळवून साधं वरण तयार केलं.

  3. 3

    चटणी साठी सर्व साहित्य घेऊन,मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले.

  4. 4

    बासुंदी साठी दूध आटवत ठेवले.अर्धे आटले की त्यात साखर आणि ड्राय फ्रुट,वेलची घालून पाच मिनिट उकळू दिले.

  5. 5

    पापड तळून घेतले.मीठ,तूप आणि लोणचे तयार ठेवले.

  6. 6

    पुऱ्या साठी,गव्हाच्या पिठात बाकी साहित्य घालून घट्ट आटा भिजवून दहा मिनिटे झाकून ठेवला.

  7. 7

    आट्याची मोठी पोळी लाटून, त्याचे वाटीच्या साहाय्याने गोलाकार पाडून,पुऱ्या गरम तेलात तळून घेतल्या.

  8. 8

    भाजीसाठी सर्व साहित्य घेतले.कढईत तेल जीरे मोहरी,हिंग, कडीपत्ता,मिरचीची फोडणी केली,त्यात कांदा लालसर होईपर्यंत परतला.मग त्यात हळद घातली.

  9. 9

    आता त्यात उकडून चिरलेला बटाटा,मीठ,साखर,कोथिंबीर, खोबरं घालून नीट मिक्स करुन घेतले.दोन मिनिटे वाफ आणली.

  10. 10

    आता सगळं जेवण बनवून तयार झाल्यावर पान वाढलं.मीठ,लोणचं,चटणी,पापड, पुरी,भाजी, वरण भातावर साजुक तुपाची धार सोडली. बासुंदीची वाटी,हे सर्व वाढले की पूर्ण पान वाढून झाले.पाण्याचा पेला तयार ठेवला.लगेच जेवायला बसलो.छोटासा पण छान बेत झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes