पत्ता कोबी ची कोफता करी (patta gobhichi kofta curry recipe in marathi)

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300

कालच मम्मी कडून घरी आले।भाज्यांचा फ्रिजमध्ये मध्ये अकाल।फक्त एक छोटी पत्ताकोबी होती।विचार केला छोटी पत्ताकोबी सगळ्यांना पुरणार नाही मग करायचं तरी काय तर मग पत्ताकोबी चे कोफ्ते केले आणि बिलीव्ह मी खूप यम्मी टेस्टी झाले।

पत्ता कोबी ची कोफता करी (patta gobhichi kofta curry recipe in marathi)

कालच मम्मी कडून घरी आले।भाज्यांचा फ्रिजमध्ये मध्ये अकाल।फक्त एक छोटी पत्ताकोबी होती।विचार केला छोटी पत्ताकोबी सगळ्यांना पुरणार नाही मग करायचं तरी काय तर मग पत्ताकोबी चे कोफ्ते केले आणि बिलीव्ह मी खूप यम्मी टेस्टी झाले।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1छोटी पत्ताकोबी
  2. 2कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 3-4 हिरव्या मिरच्या
  5. 1 टेबल स्पूनआले-लसूण पेस्ट
  6. 1 1/2 टेबलस्पूनतेल
  7. 1 1/2 टेबलस्पूनबेसन
  8. 1 टेबल स्पूनतांदळाचे पीठ
  9. 1 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  10. 2 टिस्पून तिखट
  11. 2 टी स्पूनधणेपावडर
  12. 1 टी स्पूनगरम मसाला
  13. 2 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम पत्ताकोबी चिरुन मिक्सरच्या पाॅट मध्ये घ्या त्यात हिरवी मिरची घालून त्याला ग्राइंड करून घ्या।आता ग्राउंड केलेली पत्ताकोबी मिरची एका भांड्यात हा त्यात तिखट, मीठ, धणे पावडर प्रत्येकी एक टीस्पून व बेसन आणि तांदळाचे पीठ आणी अर्धी कोथिंबीर घालून गोळा भिजवून घ्या, पाणी घालायची गरज नाही कारण पत्ता कोबी ला जे पाणी सुटेल त्यातच आम्हाला हे सगळे मिक्स करायचा आहे गरज पडल्यास बेसन व तांदळाचे पीठ ऍड करू शकता।

  2. 2

    गोळा तयार झाल्यावर त्याचे कोफ्ते तेलात तळून घ्या।

  3. 3

    कोफ्ते तळून झाल्यावर त्याच तेलात कांद्याची पेस्ट घाला।ती साधारण तीन मिनिट होऊद्या त्याला तेल सुटलं की आले-लसूण पेस्ट घाला।व दोन मिनिटांनीत्यात टोमॅटोची पेस्ट घाला।

  4. 4

    आता याला खमंग होऊ द्या त्याला कढईच्या साईडने तेल सुटायला लागेल तेल सुटायला लागलं की त्यात तिखट, धणेपूड आणि गरम मसाला प्रत्येकी एक टीस्पून त्यात घाला।आणि एक मिनिट होऊ द्या।त्यात आवश्यकतेनुसार पाणी ॲड करा ग्रेव्हीसाठी ही ग्रेव्ही थोडी थीक असते तर त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता।याला चांगली उकळी आली की आपली करी रेडी आहे।

  5. 5

    आता सर्व्हिंग प्लेटमध्ये कोफ्ते काढा त्यावरून ही करी घाला।त्यावर कोथिंबीर यांनी गार्निश करा।आणि आता ही पत्ता कोबीची कोफ्ता करी पराठे, नान किंवा जिरा राईस बरोबर एन्जॉय करा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes