पारंपारिक खमंग-खुसखुशीत वरई चे थालीपीठ (varai che thalipeeth recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

#रेसिपिबुक #week3
नैवेद्य 2
एकादशी दुप्पट खाशील म्हणतात ते खरेच आहे न, किती पदार्थ करावेत तेवढे कमीच पडतात.दिवसभर भरपूर पदार्थ होतात वरई चा भात, आमटी, दह्याची शेंगदाणा चटणी, शेंगदाण्याची आमटी, वरई चे थालीपीठ, आणि अजून वरचे बरेच काही,पण या पदार्था सोबत जोडलेल्या असतात काही आठवणी जे हे पदार्थ पुन्हा बनवताना आठवण करून देतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

Prep:6-7 तास, cook:30मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमवरई चे तांदूळ
  2. 50 ग्रॅमसाबुदाणा
  3. 1 वाटीभाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  4. 1 टेबलस्पूनजीरे
  5. 5-6हिरव्या मिरच्या
  6. मीठ चवीनुसार
  7. कोथिंबीर आवश्क्तेनुसार
  8. तेल आवश्यकतेनुसार
  9. 3बटाटे

कुकिंग सूचना

Prep:6-7 तास, cook:30मिनिट
  1. 1

    प्रथम वरई निवडून घ्यावी आणि मग ती रात्र भर भिजत ठेवावी, त्या सोबत साबुदाणा देखील वेगळा भिजत घालावा.

  2. 2

    बटाटे उकडून ठेवावेत. वरई मधील पाणी काढून टाकावे, आणि वरई व साबुदाणा मिक्सर मध्ये बारीक करावे, पाणी घालू नये.

  3. 3

    जीरे भाजून घ्यावे, मिरच्या आणि जीरे मिक्सर ला बारीक करावेत, शेंगदाणे चा कूट करावा.

  4. 4

    सर्व मिश्रण एक बाउल मध्ये काढावेत. त्यात मीठ, मिरची जीरे ची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर आणि बटाटे मॅश करून घालून थालीपीठ चे मिश्रण मळून घ्यावे. या मध्ये कुठेही पाणी वापरू नये.

  5. 5

    थालीपीठ थापून तेल सोडून झाकावे, आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजावे.खुसखुशीत गरम थालीपीठ शेंगदाण्याची दह्यातील चटणी, उपवासाचे लोणचे किंवा आमटी सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes