उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)

Priyanka Kulkarni
Priyanka Kulkarni @priyanka1

CKPs
#ngnr

उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)

CKPs
#ngnr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाट्यावरीचे तांदूळ
  2. 1/2 वाटी साबुदाणा
  3. 2-3उकडलेले बटाटे
  4. थोडेसे जीरे
  5. 3-4 वाटलेल्या हिरव्या मिरच्या
  6. 2 चमचेशेंगदाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ
  7. थालीपीठ थापण्यासाठी व भाजण्यासाठी तूप

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम वरीचे तांदूळ,साबुदाणा व जीरे भाजून घ्यावे मग ते मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे.

  2. 2

    उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावे

  3. 3

    एका परातीत वरीचे तांदूळ साबुदाणा व जीरे ह्याचं वाटलेले मिश्रण घ्यावं व त्यात कुस्करलेला बटाटा टाकावा.

  4. 4

    मग त्यात वाटलेली मिरची, दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घालून पीठ मळून घ्यावे.

  5. 5

    नंतर गॅसवर फ्राय पॅन गरम करत ठेवावा.

  6. 6

    पोलपाटावर प्लास्टिकची पिशवी घालून त्यावर तूप लावून ठेवावे आणि या भिजवलेल्या मिश्रणाचे गोळे करून ते त्यावर थापावे.

  7. 7

    फ्राय पॅन मध्ये थोडेसे तूप लावून थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यावे आणि खोबऱ्याच्या चटणी बरोबर खावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka Kulkarni
Priyanka Kulkarni @priyanka1
रोजी

Similar Recipes