वरई तांदूळ पोटैटो स्टफ्ड उपवासाचा कुरकुरित पॅनकेक (upwasacha pancake recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#पॅनकेक
पॅनकेक जगभरातील बर्‍याच संस्कृती मध्ये प्रसिद्ध डिश आहे, जी एक प्रकारची सपाट ब्रेड किंवा साधा केक आहे, जो गोड किंवा तिखट असतो . आपण भारतात डोसा, आणि महाराष्ट्रात धिरडे म्हणू शकतो.

पॅनकेक रेसिपीत पिठ, अंडी आणि दूध हे मूलभूत खाद्य पदार्थ असतात. अमेरिका आणि कॅनडासारख्या काही देशांमध्ये, पॅनकेक्स न्याहारी म्हणून दिले जातात, युरोपमध्ये इतर काही देशांमध्ये पॅनकेक्स रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ म्हणून खातात,

(आकारानुसार, थोडेसे अधिक किंवा कमी) तयार करू शकता. आपण अतिथींच्या संख्येनुसार अन्नपदार्थांचे प्रमाण घेतात.

उपवासाचा पॅनकेक बनविण्यासाठी भगर, साबुदाणा, राजगिरा पीठाचे बैटर बनवावे लागते. हा पॅनकेक सोपा आणि इन्स्टंट होणारा आहे ह्यात भगर, साबुदाणा रात्री भिजवावा लागत नाही. हा पॅनकेक चवीमध्ये थोडा वेगळा आहे. स्वादिष्ट आहे. आहे आपण पॅनकेक मधे बटाट्याची चटनी स्टफ्ड करणार आहोत.

तर चला तर आज करूयात इन्स्टंट वरई तांदूळ (भगर ) पोटैटो स्टफ्ड उपवासाचा कुरकुरित, स्वादिष्ट पॅनकेक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे सर्विंग
4 सर्विंग
  1. 5 टेबलस्पूनवरई तांदूळ (भगर)
  2. 2 टेबलस्पूनसाबूदाना
  3. 2 टेबलस्पूनराजगिरा पीठ
  4. 4हिरव्या मिरच्या
  5. 1 टीस्पूनमिरे पूड
  6. चवीनुसार शेंदा मीठ
  7. 3उकळलेले बटाटे
  8. 4हिरव्या मिरच्या
  9. चवीनुसार मीठ
  10. 2 टेबलस्पूनमीडियम जाडसर शेंगदाण्याचा कूट
  11. आवश्यकतेनुसार पाणी
  12. 1 टीस्पून तूप
  13. 5 टेबलस्पूनदही

कुकिंग सूचना

45 मिनिटे सर्विंग
  1. 1

    प्रथम भगर व साबुदाणा मिक्सर मधे बारीक रवाळ वाटून घ्या.
    बारीक केलेली भगर व साबुदाणा, राजगिरा पीठ, दही आणि चिमूटभर खाण्याच्या सोडा, शेंदा मीठ पाणी टाकून सर्व मिश्रण एकत्रित करा. मिश्रण जास्त घट्ट पण नको आणि पातळ पण नको मिश्रण मीडियम घट्टसर भिजवा. मिश्रण ३०मिनिटें झाकण ठेवून बाजूला ठेवा.

  2. 2

    पॅन केक मधे सारण भरण्यासाठी बटाट्याच्या चटणीसाठी 3 बटाट्यांची साल काढून त्यांना बारीक कुस्कुरून घ्यावे. 4 हिरव्या मिरच्यांचे काप करून व मिरे पूड, शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घालावे कढईत 1 टीस्पून्स तूप टाकून वरील मिश्रण मंद गॅसवर १मिनिट ठेऊन मिक्स करावे चांगले परतून काढावे. आपली बटाट्याचे चटनी तयार झाली.

  3. 3

    आता तवा गरम करायला ठेवून मध्यम गरम झाल्यावर तेल टाकावे.व साधारण जाडसर मिश्रण पसरवावे व त्यावर बटाट्याचे चटनी ठेवावी आणि त्यावर परत मिश्रण टाकून पसरवणे. बटाट्याच्या चटनीला मिश्रणाने झाकणे.

  4. 4

    साईडने थोडे तेल टाका झाकण ठेवुन शिजवा मिश्रण जाडसर असल्याने जाड झाकण ठेवून 2 मिनीट शिजवावे. व परतवून घ्यावे.आता दुसऱ्या बाजूनेही झाकण ठेवून शिजवून घ्यावे.खरपूस होईपर्यंत शिजवा.

  5. 5

    तयार आहे आपले इन्स्टंट वरई तांदूळ (भगर) पोटैटो stuffed उपवासाचा कुरकुरित, स्वादिष्ट पॅनकेक दह्यासोबत सोबत गरमागरम खायला सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes