अळूचं गरगटं (alucha gargata recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#रेसिपीबुक
#week7
#सात्विक-बिना कांदा- लसुण रेसिपी
#पोस्ट 2
आज मी अळूचं गरगटं केल.आमच्या कडे श्रावणात उपवास सोडते वेळी ही भाजी आवर्जून खाल्ली जाते. नुसती खायला पण ही भाजी छान लागते. तिखट, गोड,आंबट या तिन्ही चवींचा सुरेख संगम या भाजीमधे छान जुळून येतो.🥰🥰🥰

अळूचं गरगटं (alucha gargata recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week7
#सात्विक-बिना कांदा- लसुण रेसिपी
#पोस्ट 2
आज मी अळूचं गरगटं केल.आमच्या कडे श्रावणात उपवास सोडते वेळी ही भाजी आवर्जून खाल्ली जाते. नुसती खायला पण ही भाजी छान लागते. तिखट, गोड,आंबट या तिन्ही चवींचा सुरेख संगम या भाजीमधे छान जुळून येतो.🥰🥰🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 व्यक्ती
  1. 10ते 12 अळूची पानं
  2. 1/2 कपहरभरा डाळ
  3. 1/2भिजवलेले शेंगदाणे
  4. 1/2 कपमुळा बारीक चिरून
  5. मुठभर कढीपत्ता
  6. 2 टेबलस्पूनचिंच
  7. 4ते 5 हिरव्या मिरच्या
  8. 1/2 टीस्पूनहिंग
  9. 1/2 टीस्पूनमोहरी
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1/2मेथी दाणे
  12. मीठ चवीनुसार
  13. गुळ चवीनुसार
  14. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    अळू स्वच्छ धुवून घ्यावेत. त्याचे देठ कट करून त्याची साल काढावी. अळूची पाने & देठ बारीक चिरून घेणे.

  2. 2

    फोडणीत हिरवी मिरची & मेथी दाणे,कढीपत्ता, हळद घालून परतून घ्यावे. यात चिरलेला अळू घालून 3 ते 4 मिनिटे परतून घ्यावे.

  3. 3

    कुकर मध्ये परतलेला अळू,शेंगदाणे, हरभरा डाळ, मुळा घालून & कोमट पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या देणे.

  4. 4

    कुकर थंड झाल्यावर या मिश्रणात बेसन घालून चांगले घोटून घ्यावे. एक उकळी द्यावी.

  5. 5

    नंतर... चिंचेचे पाणी, चवीनुसार मीठ, गुळ घालून एकजीव करून घ्यावे. मंद गॅसवर पुन्हा एकदा 1 ते 2 उकळी काढावी. आपल्या आवडीनुसार लाल मिरची चा तडका द्यावा..छान चव येते नाही तडका दिला तरी चालेल..हि भाजी छान मिळून आली पाहिजे. तरच याची खरी चव येते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

Similar Recipes