मिक्स व्हेज दलिया (mix veg daliya recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसिपी मध्ये भाज्या आणि दलिया वापरून पौष्टीक अशी खिचडी केली.अतिशय रुचकर ,पचायला हलकी असते.व्हेज दलिया उपमा ही म्हणतात काही जण.

मिक्स व्हेज दलिया (mix veg daliya recipe in marathi)

#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसिपी मध्ये भाज्या आणि दलिया वापरून पौष्टीक अशी खिचडी केली.अतिशय रुचकर ,पचायला हलकी असते.व्हेज दलिया उपमा ही म्हणतात काही जण.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनीटे
२-३
  1. 1/2 कपदलिया
  2. 3 टेबलस्पूनसाजुक तूप
  3. 2 कपपाणी
  4. 1/4 कपचिरलेली फरसबी
  5. 1/4 कपचिरलेले गाजर
  6. 1बटाटा
  7. 1टोमॅटो
  8. 1/4 कपचिरलेली शिमला मिरची
  9. 1/4 कपवाटाणे
  10. 1 टीस्पूनजीरे, मोहरी
  11. 1/4 टीस्पूनहिंग
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. 5-6कडीपत्ता पाने
  14. 1हिरवी मिरची
  15. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  16. 1 टेबलस्पूनलिंबूरस
  17. 2 टीस्पूनसाखर
  18. 1/2 टीस्पूनमीठ
  19. 2-3 टेबलस्पूनखवलेले खोबरे

कुकिंग सूचना

१०-१५ मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.सर्व भाज्या चिरून घेतल्या.

  2. 2

    दलिया किंवा लापशी रवा धुवून, कुकर मधून शिजवून घेतला.तोपर्यंत कढईत भाज्या शिजवल्या.

  3. 3

    कढईत दोन टेबलस्पून तूप घालून त्यात जीरे मोहरी घालून फोडणी केली.त्यात मिरची कडीपत्ता घातला,हिंग घातला.गाजर,फरसबी,बटाटे घालून परतले.१/२ कप पाणी घालून झाकण ठेऊन शिजवले.

  4. 4

    ह्या भाज्या शिजत आल्या आणि पाणी आटले की टोमॅटो,शिमला मिरची, वाटाणे घातले.माझ्याकडे फ्रोजन पीज होते ते मी वापरले. कोथिंबीर घातली.

  5. 5

    भाज्या शिजल्या की, शिजलेला दलिया त्यात घालून मिक्स केले.त्यात मीठ,साखर,लिंबूरस घालून मंद आचेवर पाच मिनिटे ठेवले.तयार दलियावर

  6. 6

    तयार दलिया बाउल मध्ये काढून घेतला.त्यावर साजूक तूप आणि खवलेले खोबरे घालून सजवले आणि गरम गरम सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes