मिल्क फ्राय (milk fry recipe in marathi)

#दूध
एक वेगळाच प्रकारे दूध फ्राय केलेलं आहे.अतिशय चविष्ट लागतं. बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट तोंडात वितळेल असं......
मिल्क फ्राय (milk fry recipe in marathi)
#दूध
एक वेगळाच प्रकारे दूध फ्राय केलेलं आहे.अतिशय चविष्ट लागतं. बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट तोंडात वितळेल असं......
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये कॉर्नफ्लॉवर व साखर एकत्र करून घ्यावी. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.आता त्यामध्ये दोन वाट्या दूध टाकून गुठळ्या न होऊ देता एकत्र मिक्स करायचं आहे. त्याची एक प्रकारची पेस्ट तयार झाली पाहिजे.
- 2
हे मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला ते गॅस वरती ठेवायचं आहे.आणि सतत ढवळत राहायचं आहे. म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही. ते व्यवस्थित एक पेस्टमध्ये तयार होईल. पाच मिनिटांमध्ये हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते. पण आपल्याला ते सतत ढवळत राहायचं आहे.
- 3
आता एका चौकोनी भांड्यामध्ये बटर पेपर ठेवायचा आहे. त्यामध्ये हे मिश्रण ओतायचे आहे. (बटर पेपर अवेलेबल नसल्यामुळे मी एक साधा पेपरला बटर लावून घेतला आहे) आता हा डबा आपल्याला जास्तीत जास्त दोन तास आणि कमीत कमी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे.
- 4
आता हे एकदा सेट झालं की आपल्याला डबा पलटी करायचा आहे व त्यातून आपल्याला हा ब्लॉक बाहेर काढायचा आहे. अगदी सहजपणे तो निघून येतो. आता हा पेपर आपल्याला काढून टाकायचा आहे व त्याचे छोटे छोटे पिसेस करायचे आहेत किंवा तुम्हाला आवडेल त्या सेफमध्ये तुम्ही कापू शकता.
- 5
आता आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला एका भांड्यात मैदा घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे पिठीसाखर टाकायची आहे. व त्यामध्ये मीठ टाकायचं आहे.आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून पेस्ट तयार करायची आहे.जसे आपण भजी साठी बेसन तयार करतो तसेच आपल्याला येथे पेस्ट तयार करायची आहे. आता आपल्याला ब्रेडक्रम्स सुद्धा घ्यायचे आहेत.
- 6
आता आपल्याला पहिलं पीस मैद्याच्या बॅटर मध्ये घोळवायचा आहे.त्यानंतर ब्रेडक्रम मध्ये घोळवून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हे ठेवायचे आहेत. आणि ती प्लेट आपल्याला दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायची आहे.
- 7
एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेले पीस बाहेर काढून आपल्याला एक एक करून तळून घ्यायचे आहेत. आणि आपलं तयार होईल मिल्क फ्राय.....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्पॅनिश डेझर्ट एगलेस फ्राइड मिल्क (spanish dessert eggless fried milk recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी. फ्राईड मिल्क हा स्पॅनिश डेझर्ट चा प्रकार आहे. अंड वापरून किंवा एगलेस दोन्ही पद्धतीने हे बनवले जातात. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे डेझर्ट बनते. Shital shete -
बटर फ्राय ब्रेड (butter fry bread recipe in marathi)
#cooksnap#Suchita Lavhale#यांनी केलेली बटर फ्राय ब्रेड ही झटपटीत होणारी कुरकुरीत रेसिपी मी cooksnapकरीत आहे. rucha dachewar -
कोहळ्याचे बोंड (Kohalyache Bond Recipe In Marathi)
#स्विट #कोहळ्याचे बोंड.... वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे कोहळ्याचे बोंड एकदम सुंदर लागतात... ज्यांना कोहळ (पम्किन )आवडत नाही त्यांना अशा प्रकारे वस्तू करून आपण खाऊ घालू शकतो... Varsha Deshpande -
मिल्क केक/कलाकंद (milk cake recipe in marathi)
#GA4 #Week8 की वर्ड...दूधमिल्क केक दूध .. कामधेनु चे पृथ्वीवर पडलेले अमृताचे थेंब म्हणता येईल. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे दूध हे पूर्णान्न आहे आणि आबालवृद्धांच्या साठी ते शरीरास अत्यंत पोषक आणि शरीराची वाढ करणारे आहे. त्यात आणि आपला भारत देश दूध दुभत्याचा देश म्हणून ओळखला जातो इथे दुधाची गंगाच वाहते. दिवसभरात एक कप दूध प्यायला वर त्यातून प्रोटीन, कॅल्शियम आपल्याला सहज मिळते. पण दूध न आवडणारे बरेच जण आहेत.. या यादीतील एक मिठाई म्हणजे मिल्क केक किंवा कलाकंद..अ हा हा.. नुसते नाव घेतले तरी आनंदाची पर्वणीच.. तशी या पदार्थाशी माझी ओळख जुनीच.. माझा मुलगा लहान असतानाची गोष्ट.. त्याचा जन्म ऑक्टोबर मधला.. त्यामुळे एकदा ऐन नवरात्रीत त्याचा वाढदिवस आला.. आता वाढदिवसाला म्हणजे केक हवाच.. आता नवरात्रीत कसा आणायचा केक..तो सुद्धा अंडयाचा.. त्यावेळी बिना अंड्याचे केक जास्त प्रचलित नव्हते.. काय करावे बरे.. असं म्हणत मी आमच्या नेहमीच्या बिस्किट मार्ट कडे गेले.. आणि त्यांना म्हटलं की मला केक हवाय पण बिनाअंड्याचा.. तर ते म्हणाले मिल्क केक घ्या ना .केक आणि दुधाचा.मला थोडे आश्चर्यच वाटले.त्यांनी मला तू खमंग खरपूस चवीचाआणि वासाचा मिल्क केक मला दाखवला. केक सारखाच आकार होता.अशी माझी मिल्क केकशी झालेली पहिली खमंग भेट .न विसरता येणारी.तेव्हांपासून आजतागायत सिलसिला सुरूच Bhagyashree Lele -
क्रिस्पी प्रॉन्स फ्राय (prawns fry recipe in marathi)
कोळंबी साफ करायला जरा वेळ जास्त लागतो पण शिजायला किंवा फ्राय करायला घेतली की झटपट होते. तेलात तळून काढण्या पेक्षा तव्यावर थोड्याशा तेलात फ्राय केलेली कोलंबी खूप टेस्टी लागते. या प्रकारे केलेली कोळंबी फ्राय करताना सुटलेला त्याचा वास भूकेला निमंत्रण देतो. फिश पेक्षा आमच्याकडे कोलंबी फ्राय जास्त आवडीने खाल्ली जाते. Sanskruti Gaonkar -
इडली फ्राय (Idli Fry Recipe In Marathi)
शिल्लक राहिलेल्या इडल्यांपासून कुरकुरीत चविष्ट इडली फ्राय#SIR Neelam Ranadive -
मांदेली बोंबील फ्राय (Mandeli Bombil Fry Recipe In Marathi)
बांधिली बोंबील ही सदैव मिळणारी मज्जा आहे ही मच्छी कालवणात जेवढी छान लागते तेवढीच फ्राय केल्यावरही छान लागते, अगदी कुरकुरीत लागते आणि साध्या बरोबर तोंडी लावता येते. Anushri Pai -
सुरण फ्राय (Suran Fry Recipe In Marathi)
सुरणाच्या चकत्या करून त्या फ्राय करून त्याच्यावर मसाला टाकला की ते अगदी चविष्ट लागतात Charusheela Prabhu -
इमोजी पॅन केक (emoji pan cake recipe in marathi)
#अंडा पॅनकेक्स हलकेच कुरकुरीत असतात आणि आतून मऊ असतात, आपण न्याहारीसाठी पॅनकेक्स देखील देऊ शकता. Sneha Kolhe -
भगर आप्पे फ्राय (Bhagar Appe Fry Recipe In Marathi)
#LOR#उपवासरेसिपीउपवासासाठी तयार केलेले भगरीचे आप्पे जेव्हा शिल्लक राहतात त्यातून हा अगदी चविष्ट उपवासाचा अप्पे फ्राय पदार्थ तयार करता येतो चविष्ट लागतात Sushma pedgaonkar -
बटाटा फ्राय (batata fry recipe in marathi)
#आई आई बटाटा फ्राय तिच्या उपवासाला हमखास बनवायची.ती त्याला फ्रेंच फ्राय वगैरे म्हणायची नाही.त्यामुळे ह्या पदार्थाला फ्रेंच फ्राय म्हणतात हे आम्हाला मोठेपणी कळले.आईसाठी झटपट बटाटा फ्राय... Preeti V. Salvi -
चुर्रोस (Churros recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपीचुर्रोस ही मेक्सिकन,स्पॅनिश डेझर्ट ची डिश आहे, ही चॉकोलेट सॉस बरोबर सर्व्ह केली जाते,खूप कमी साहित्यात बनविली जाणारी ही डिश फ्राय केली जाते नन्तर दालचिनी आणि साखर चे कोटिंग केले जाते आतून सॉफ्ट वरून क्रिस्पी अशी ही चुर्रोस ची पाककृती पाहुयात. Shilpa Wani -
अमृतसरी फिश फ्राय (amrutsari fish fry recipe in marathi)
#उत्तर#(पंजाब) अमृतसरला फिश फ्राय खूप प्रसिद्ध आहे. फिश फ्राय हा गोड्या पाण्यातल्या माशा पासून तयार केला जातो. पंजाब मधील नद्या आहे तिथून मिळणाऱ्या माशांपासून फिश फ्राय बनवला जातो. Purva Prasad Thosar -
मिल्क क्रंम्बल्ड डिलाईट (milk crumbled delight recipe in marathi)
#दूधमाझ्या 150 रेसिपीज पूर्ण झाल्या,,😎🤩दुधाची थीम आली तेव्हा काय करावे हा प्रश्न पडला,,बर रेसिपी केल्यावर नाव काय द्यायचे याचा पण मोठा प्रश्न 😝😝 कारण जनरली दुधाचे साधारण सर्व एकच एक प्रकार असतात,,मी केलेला हा मिल्क डिलाईट हा काही खूप वेगळा नाहीये त्यातलाच आहे पण थोडासा फरक केलेला आहे माझ्या पद्धतीने,,खूप दिवसापासून गोड हा प्रकार इतक्यात केला नव्हता,मग विचार केला की चला दुधाच्या निमित्ताने काहीतरी वेगळा प्रकार करावा,,हा माझा प्रयोग होता पण हा प्रयोग सफल झाला,मुलांना हा प्रकार अतिशय आवडला...खव्यापासून केलेला हा प्रकार चवीला अतिशय सुंदर झाला,थोडेफार बदल केले बाकी काही नाही,,तुम्ही पण करून बघा आणि सांगा मला कसं झालं हे मिल्क डीलाईट,,, Sonal Isal Kolhe -
चिकन नगेट्स (Chicken Nugget Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryस्ट्रीट फूड म्हटलं की असंख्य पदार्थ डोळ्यासमोर येतात. पण अतिशय कुरकुरीत चमचमीत त्याचबरोबर सॉफ्ट आणि वेगळीच चव असलेले हे नगेट्स आपण नक्कीच ट्राय करू शकतो. दोन Anushri Pai -
मसाला सुरमई फ्राय (masala surmai fry recipe in marathi)
#GA4#week18#fishकिंग फिश / मॅकरेल म्हणून ओळखली जाणारी सुरमई ही अतिशय चवदार आणि आकर्षक मासा आहे. तांदळाचे पीठ कोटिंगसाठी वापरल्या ने वरून कुरकुरीत आणि आतून मऊ माशासह चवदार लागतो. चला तर मग बनवूया मसाला सुरमई फ्राय 😀 Vandana Shelar -
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2 #w2नेहमी एकाच पद्धतीने केलेली भेंडीची भाजी खायचा कंटाळा येतो ,कधीतरी चटपटीत खावेसे वाटते तेव्हा ही कुरकुरीत भेंडी फ्राय करा आणि मुल सुद्धा ही कुरकुरीत भेंडी आवडीने खातात Rohini Jagtap Gade -
दुधापासून- गुलाब जामून (milk gulabjamun recipe in marathi)
#दूधगुलाब जामून.आज रक्षाबंधन भाऊ-बहिणीचा प्रेमाचं नात. असंच गोड नात राहण्यासाठी. आज स्पेशल गुलाब जामून बनवले आहे. Sapna Telkar -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#tmr पापलेट आवडत नसेल असे फार कमीच असतील आणि त्यातही जर पापलेट फ्राय असेल तर त्या खूपच मज्जा चला तर मग आज आपण बनवण्यात पापलेट फ्राय माझी फार आवडती रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारे फक्त मॅरीनेशन करून ठेवलं की रेसिपी पटकन होते Supriya Devkar -
मोहक मसाला मिल्क (masala milk recipe in marathi)
#thanksgiving #cooksnapमी कुकपॅड author भाग्यश्री लेले यांची मूळ रेसिपी 'मसाला दूध' वरुन ही कृती पुन्हा तयार केली आणि ती बनविली. भाग्यश्री ताई तुमची ' मसाला दूध ' रेसिपी अतिशय चवदार 😋 आणि स्वादिष्ट 👌आहे. रेसिपी share केल्याबद्दल धन्यवाद. 🙏मसाला दूध यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेल्या इतर अनेक पौष्टिकांनी भरलेले आहे. या मधुर पेयमध्ये दूध हा मूलभूत घटक आहे.दूध, कोरडे फळे आणि इतर मसाल्यांचा मिश्रण म्हणजे सर्व एकत्रितपणे मसाला दूध म्हणून ओळखले जाणारे पेय. Pranjal Kotkar -
सुरण फ्राय (suran fry recipe in marathi)
#KS1 रेसिपी 4सुरण फ्राय ही रेसिपी अतिशय चविष्ट आणि कमी तेलात. कमी साहित्यात, कमी वेळेत व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही लोकांना आवडेल अशी रेसिपी आहे. सुरणची भाजी कोणाला आवडत नसेल तर त्याला हा पर्याय उत्तम आहे. Manisha Satish Dubal -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#mdपावसाळा येताच आई आम्हाला बटाट्याच्या भजीने आश्चर्यचकित करायची. बाहेरून कुरकुरीत आणि आतून कोमल, मधुर आणि चवदार. Kavita Ns -
कढई फ्राय इडली (Kadhai Fry Idli Recipe In Marathi)
अतिशय वेगळा व सुंदर असा टेस्टी प्रकार वरती क्रंची आतून सॉफ्ट अशी जम्बो होते पण खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
कुरकुरीत सुरण फ्राय (kurkurit suran fry recipe in marathi)
#GA4#week14#keyword_yam_सुरण"कुरकुरीत सुरण फ्राय" औषधी गुणांनी सर्वात श्रेष्ठ सुरण आहे.बाजारात गेल्यावर सा-या भाज्यांमध्ये कुरूप, ओबडधोबड, अशी जर कोणती भाजी असेल तर ती आहे, सुरणाची! याचे वरील कवच जाड, खडबडीत आणि साधारण करडय़ा, तांबुस, तपकिरी रंगाचे असते. तर आतून मात्र सुरण गुलाबी, पिवळट असतो. एका सुरणाचे वजन जास्तीत जास्त ७० किलोपर्यंत असू शकते. सुरण दोन प्रकारचा असतो. एक खाजरा व दुसरा गोड. खाजरा औषधी तर गोड खाण्या साठी उपयुक्त.चला तर मग खमंग कुरकुरीत असे "सुरण फ्राय" करूया. Shital Siddhesh Raut -
मिल्क रोझ (Milk Rose Recipe In Marathi)
#दूधमिल्क रेसिपीदूध हा असा पदार्थ आहे की जो बरेच गोड पदार्थ बनवताना वापरला जातो.सकाळची सुरुवात प्रत्येक घरात दुधापासूनच होते.मी अगदी सोप्पे अशे गुलाबाचे फुल बनवले आहेत की ज्यात दूध,मिल्क पावडर,कंडेंन्स मिल्क, अशे दुधापासूनच तयार होणारे पदार्थ वापरले आहे. Deveshri Bagul -
टायगर प्राॅन्स फ्राय (Tiger Prawns Fry Recipe In Marathi)
#WWRथंडीच्या दिवसात कुरकुरीत, मसालेदार, चविष्ट आणि मुख्य म्हणजे गरमागरम असे पदार्थ खायला खूप मजा येते ,आणि जायंट प्रॉन्स फ्राय हे फक्त गरम खाल्ले तरच," क्या बात है". थंड झाले की मात्र खायची इच्छा होत नाही आणि म्हणून थंडीतील या स्पेशल गरमागरम रेसिपी चा अनुभव नक्कीच घ्यायला हवा. Anushri Pai -
सुरमई फ्राय
#सीफूडमासे खवय्यांसाठी फिश फ्राय म्हणजे पर्वणीच म्हणावे लागेल. गरमागरम असं फिश फ्राय समोर आल्यावर आपण त्यातील एक तुकडा घेवून त्यातील काटा काढून अलगद तोंडात कधी घालतो हे खुद्द खाणार्यालाही कळत नाही. इतका या फिश फ्रायचा महिमा अवर्णनीय आनंद देऊन जातो. Ujwala Rangnekar -
रोझ मिल्क केक (Tres Leches cake) (rose milk cake recipe in marathi)
#केक #differentखरंतर ही खूप उशिरा टाकली गेलेली पोस्ट आहे, माझ्या नवऱ्याचा वाढदिवस एप्रिल मध्ये येतो .मी दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारचे केक ट्राय करते पण मी काही बेकर नाही त्यामुळे काही वेळा केक छान होतात तर काही वेळा पूर्ण फसतात. यावेळेला माझ्या नवऱ्याने रोज फ्लेवर चा केक कर असे मला सांगितले आणि मग एक वेगळीच रेसिपी मला युट्युब वर बघायला मिळाली. आणि काय सांगू अतिशय सुंदर असा हा रोझ मिल्क केक माझ्याकडून बनवला गेला. तोंडात विरघळेल अशी अप्रतिम चव या केक ला असते. वेगवेगळे फ्लेवर वापरून आपण हे मिल्क केक बनवू शकतो. चला बघुया रेसिपी मी बनवलेल्या रोझ मिल्क केक ची..Pradnya Purandare
-
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
#EB11 #W11E- book विंटर स्पेशल रेसिपीजमाझ्या घरातील मंडळींना काही ठराविकच मासे आवडतात. त्यापैकीच 'सुरमई फिश'. काटे कमी आणि चविष्ट असल्यामुळे घरात सर्वांनाच आवडते. तर बघुया! "सुरमई फ्राय" रेसिपी 😊 Manisha Satish Dubal -
कोलंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fishकोलंबी फ्राय हे आमच्या घरी सर्वांना खूप आवडते. मला तर फिश फ्राय मधे कोलंबी फ्राय हे सगळ्यात जास्त आवडीची आहे. साफ करताना त्याचे बाहेरील कवच काढावे, आणि आतील दोरा अलगद न तूटता काढावा, तो दोरा पांढरा, लाल किंवा काळ्या रंगाचा असतो. दोरा नाही काढला तर पोटात दुखते. खरपूस कुरकुरीत कोलंबी फ्राय बनवायला खूप सोपी अगदी पटकन होते. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar
More Recipes
टिप्पण्या (6)