केसरी मसाला दूध (kesari masala doodh recipe in marathi)

Shubhangi Dole-Ghalsasi (English)
Shubhangi Dole-Ghalsasi (English) @cook_25002160

#दूध
आज नारळी पोर्णिमा असल्यामुळे सर्व नारळाच्या रेसिपी झाल्या पण रात्री आकाशात फुल मून दिसताच आमच्या घरी फर्माईश झाली. कोजागिरी पोर्णिमेसारखे केसरी मसाला दूध करा म्हणून मी ही रेसिपी केली.

केसरी मसाला दूध (kesari masala doodh recipe in marathi)

#दूध
आज नारळी पोर्णिमा असल्यामुळे सर्व नारळाच्या रेसिपी झाल्या पण रात्री आकाशात फुल मून दिसताच आमच्या घरी फर्माईश झाली. कोजागिरी पोर्णिमेसारखे केसरी मसाला दूध करा म्हणून मी ही रेसिपी केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2पेढे
  2. 1/2 लिटरदूध
  3. ड्रायफ्रूट (काजू, बदाम, पिस्ता)
  4. 1 टीस्पूनवेलदोडा पूड
  5. 1 टीस्पूनजायफळ पूड
  6. 1/4 टीस्पूनकेसरी खाण्याचा रंग
  7. 4 टेबल स्पूनसाखर

कुकिंग सूचना

15मिनिटे
  1. 1

    पेढे भांड्यात कूस करून घेतले. त्यात तापवलेले अर्धा लिटर दूध मिक्स केले.

  2. 2

    हालवुन सारखे करून दूध गॅस वर ठेवले व बारीक गॅस वर 10मिनिट उकळले. त्यात साखर, बदामाचे काप, काजूचे व पिस्ताचे तुकडे घालून पुन्हां एक उकळी दिली.

  3. 3

    ते गॅस वरून खाली उतरल्यावर थोडे थंड झाले की त्यात केसरी कलर व वेलदोडा, जायफळ ची पूड घालून थंड करून केसरी मसाला दूध सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shubhangi Dole-Ghalsasi (English)
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes