गुलाबी नारळीपाक (narali pak recipe in marathi)

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

गुलाबी नारळीपाक

#रेसिपीबुक #week8

नारलीपौर्णिमा आली की नारळाच्या वड्या करायचं ठरतंच.कधी पांढऱ्या,तर कशी पिवळ्या (केशर किंवा आंब्याचा पल्प घालून )तर ,कधी पोपटी(विड्याचे पान घालून), तर कधी गुलाबी(गाजर किंवा बीट पल्प घालून) मी या वड्या करते.यावेळी बीट घालून केल्या आहेत.

घ्या साहित्य जमवायला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
10 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमपांढरंशुभ्र ओलं खोबरं,
  2. 50 ग्रॅमबीट, उकडून,पल्प करून
  3. 200 ग्रॅमसाखर
  4. 100 मिली सायिसकट दूध
  5. गरजेप्रमाणे वेलची इसेन्स

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    बीट उकडून मिक्सरमधून दरदरीत वाटून घ्या.

  2. 2

    बीटचा पल्प वगळून सगळं साहित्य एकत्र करून दोन तास ठेवा.

  3. 3

    बीटचा पल्प मिसळून नॉनस्टिक कढईत घालून मंद आचेवर ढवळत रहा.

  4. 4

    गोळा झाला की उतरून थोडावेळ तसेच घोटा, इसेन्स घालून ढवळून तूप लावलेल्या ट्रे मध्ये ओतून समतल करून घ्या.

  5. 5

    लगेच सुरीने काप द्या.

  6. 6

    तासाभराने वड्या सुट्या करा. आणि गुलाबी नारळीपाकाचा आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नूतन सावंत
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes