होममेड पनीर (homemade paneer recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#दूध
पनीर दुधापासून बनवला जणारा एक पदार्थ आहे. पनीर म्हटले की आठवते पनीर टिक्का, पनीर बटर मसाला असे अनेक पदार्थ.हॉटेलमध्ये गेल्यावर आपण बऱ्याचदा पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो,कारण पनीरचे सर्वच पदार्थ खूप चविष्ट असतात . पनीर मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम असते. असे हे पनीर घरी पण बनवता येते चला तर रेसिपी बघुया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरदुध
  2. 1 टेबलस्पूनव्हिनेगर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम दुध गरम करून घ्या. दुधाला उकळी आल्यावर गॅस बंद करा.

  2. 2

    दुध चमच्याने हलवून घ्या. थोडी वाफ जाईल.नंतर त्यात व्हिनेगर घालून दुध फाडून घ्यावे.(लिंबाचा रस पण घालू शकता.)

  3. 3

    गाळणी ने गाळून लगेच थंड पाणी घालावे.(नाही तर पनीर खुप हार्ड होते) एका कपड्यात घेऊन बांधून घ्या.

  4. 4

    त्या वर जड वजन ठेवा.20 मिनिटे राहू द्यावे पाणी निघून जाईल व पनीर सेट होईल.(मी मार्बल चा पोळपाट ठेवला आहे)

  5. 5

    चाकू ने कट करून घ्या. हवी ती भाजी बनवा.

  6. 6

    दुध फाडल्या वर राहिलेले पाणी पीठ मळण्यासाठी, सुप किंवा भाजी मध्ये वापरू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes