खोबरा किसाचे रंगीत लाडू (coconut ladoo recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#लाडू नमस्कार मित्र मैत्रिणींनो ! लाडू म्हटले की लाडवाचे कितीतरी प्रकार डोळ्यासमोर येतात ...मग त्यात रव्याचे, बेसनाचे, डाळ्याचे, पाकाचे , पिठीसाखरेचे, गुळाचे, किंवा उपवासाला चालणारे शेंगदाण्याचे, तिळाचे इ. अनेक प्रकार असतील. पण त्यात भाजणे, पाक करणे हे करावेच लागते. पण मी आज जे दुरंगी लाडू केले आहे, त्यात गॕसचा वापर मुळीच केलेला नाही. करायला एकदम सोपे, पट्कन होणारे तसेच चवीला छान आणि पौष्टिक असे आहेत. तूम्हा सर्वांना आवडेल ही अपेक्षा ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तयार होणार 10 मि.
10 लाडू
  1. 100 ग्रॅमबारीक खोबरा किस
  2. 60 ग्रॅमकंडेन्स्ड मिल्क
  3. 1 टेबलस्पूनसुकामेवा बारीक तुकडे केलेला,
  4. 1 टीस्पूनवेलची पावडर
  5. 1 टीस्पूनखाण्याचा रंग आवडेल तो
  6. 10-12किसमिस वरुन लावायला

कुकिंग सूचना

तयार होणार 10 मि.
  1. 1

    प्रथम एका भांड्यात खोबरा किस घेऊन त्यात कंडेन्स्ड मिल्कपैकी एक टेबलस्पून ठेवून बाकी मिल्क टाकून छान एकञ करावे.तसेच त्यात वेलची पावडर, सुकामेवा घालावा. नंतर त्याचा गोळा बनवावा.... आवश्यकता असेल तरच उरलेले मिल्क टाकावे. त्याचे दोन भाग करुन एका भागात मी केशरी रंग टाकला आहे, तसा रंग टाकावा.

  2. 2

    त्यानंतर अर्धा अर्धा भाग (पांढरा आणि रंगीत) घेऊन त्याचा लाडू वळावा. वर एक एक किसमिस लावावा.

  3. 3

    तयार रंगीत लाडू बाऊलमध्ये ठेवून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes