गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#KS7 #गोविंद लाडू # या लाडूला, गोविंद लाडू का म्हणतात, माहिती नाही, पण चविष्ट आणि पौष्टिक असे हे लाडू, बनवायला अगदी सोपे आणि झटपट होणारे.. काळाच्या ओघात, इतर पदार्थच्या मागे पडलेले.. यात मी गुळ जरा कमी वापरला आहे. आपल्या आवडीनुसार थोडा जास्त ही घेवू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिट
10-12 लाडू
  1. 1 कपजाड पोहे
  2. 1 कपपेक्षा थोडा कमी बारीक गुळ
  3. 1/2 कपशेंगदाणे
  4. 1/2 कपखोबरे किस
  5. 1 टीस्पूनखसखस
  6. 7-8 खजूर
  7. वेलची पूड
  8. किसमिस

कुकिंग सूचना

20-25 मिनिट
  1. 1

    गुळ बारीक चिरून घ्यावा. पोहे निवडून घ्यावे. आता एका कढईत, पोहे 2-3 मिनिट भाजून घ्यावे. त्यानंतर मिक्सर मध्ये ते बारीक करून घ्यावे.

  2. 2

    आता शेंगदाणे भाजावे, खोबरे किंचित लाल होई पर्यंत भाजून त्यातच खसखस टाकून जरा भाजून घ्यावी.

  3. 3

    आता मिक्सर मधून आधी शेंगदाणे बारीक करावे. त्यातच खोबरे किस टाकून फिरवून घ्यावे.

  4. 4

    आता त्यात खजूर आणि गुळ तसेच वेलची पूड टाकावी आणि चांगले मिक्स करून घ्यावे. जेणेकरून गुळ छान एकजीव होईल.

  5. 5

    आता हे मिश्रण एका भांड्यात काढून, त्यात किसमिस टाकून मिक्स करून घ्यावे. आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराचे लाडू वळावेत.

  6. 6

    छान चविष्ट, खुसखुशीत, लाडू खाण्याकरिता तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes