चॉको बदाम लाडू (choco badam ladoo recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#लाडू
मला काहीतरी नवीन पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी करायची होती सर्वांनी जवळपास मला माहित असलेल्या लाडूच्या रेसिपी पोस्ट केल्या होत्या त्यामुळे मी हा नविन प्रयत्न केला आहे बघा कसा झाला.

चॉको बदाम लाडू (choco badam ladoo recipe in marathi)

#लाडू
मला काहीतरी नवीन पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी करायची होती सर्वांनी जवळपास मला माहित असलेल्या लाडूच्या रेसिपी पोस्ट केल्या होत्या त्यामुळे मी हा नविन प्रयत्न केला आहे बघा कसा झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबदाम पावडर (almond flour)
  2. 1/2 कपकंडेन्स मिल्क
  3. 1/2 कपचॉकलेट चिप्स
  4. स्प्रिंकलर (optional) काजू, पिस्ते, डेसिकेड कोकोनट आणि केकचे स्प्रिंकलर
  5. 1 टेबलस्पूनदूध
  6. 1 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    कंडेन्स मिल्क, बदाम पावडर मिक्स करून घ्यावे आणि हाताला तूप लावून छोटे छोटे लाडू वळावेत.

  2. 2

    मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये चॉकलेट चिप्स घ्यावे आणि त्यात 1 टेबलस्पून दुध घालावे आणि चॉकलेट वितळवून घ्यावे (अधूनमधून फोर्कने चेक करावे नाही तर चॉकलेट जळू शकते)

  3. 3

    जर स्प्रिंकलर वापरणार असाल तर ते बारीक कट करुन घ्या.मी इथे काजू, पिस्ते, डेसिकेड कोकोनट आणि केकचे स्प्रिंकलर वापरले आहेत.

  4. 4

    एका प्लेटला तूप लावून घ्यावे. नंतर वितळलेला चॉकलेटमध्ये केलेले लाडू घालून तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यावे आणि त्यावर स्प्रिंकल टाकून हे लाडू 1-2 तासांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे

  5. 5

    नंतर 1-2 तासांनी लाडू बाहेर काढून खावेत.

  6. 6

    टीप 1. बदाम पावडर (almond flour) नसल्यास गरम पाण्यामध्ये बदाम 1 तास भिजत ठेवावे नंतर त्याची साले काढून नॅपकिनवर ठेऊन वाळवून घ्यावेत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावेत.

  7. 7

    टीप 2. कंडेन्स मिल्क नसल्यास नॉनस्टिक पॅनमध्ये 1 वाटी दूध आणि 1/2 वाटी साखर घालून गॅसवर गरम करण्यास ठेवावे आणि सतत ढवळत रहावे साधारणपणे दूध अर्धे झाल्यावर गॅस बंद करावा आणि हे दूध एका भांड्यात काढून घ्यावे आणि थंड झाल्यावर हे दूध अजून घट्ट होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes