बेसन लाडू (मायक्रोवेव्ह रेसिपी) (besan ladoo recipe in marathi)

#GA4 #week14 #लाडू
बेसन लाडू बहुतेक सर्वांना खुप प्रिय असतात त्यामुळे घरात सतत केलें जातात. पण ते भाजण्यासाठी जी मेहनत लागते त्याला कंटाळून मग लाडू बाहेरून मागवले जातात. साहजिकच त्याची चव आपल्या आवडीप्रमाणे असतेच असे नाही. हे लाडू भाजताना तूप सुद्धा जास्त लागते त्यामुळे डाएट वर असलेल्या लोकांच्या खाण्यावर नियंत्रण येते. आमच्या घरी बेसन लाडू खूपच प्रिय आहेत त्यामुळे वरच्या वर घरी केले जातात. या वेळी पहिल्यांदाच मी नवीन घेतलेल्या माझ्या मायक्रोवेव्ह मध्ये बेसन लाडू केले आणि खूपच छान झाले. माझे काम खूपच सोपे झाले. म्हणून ही रेसिपी आज शेअर करत आहे.
बेसन लाडू (मायक्रोवेव्ह रेसिपी) (besan ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #लाडू
बेसन लाडू बहुतेक सर्वांना खुप प्रिय असतात त्यामुळे घरात सतत केलें जातात. पण ते भाजण्यासाठी जी मेहनत लागते त्याला कंटाळून मग लाडू बाहेरून मागवले जातात. साहजिकच त्याची चव आपल्या आवडीप्रमाणे असतेच असे नाही. हे लाडू भाजताना तूप सुद्धा जास्त लागते त्यामुळे डाएट वर असलेल्या लोकांच्या खाण्यावर नियंत्रण येते. आमच्या घरी बेसन लाडू खूपच प्रिय आहेत त्यामुळे वरच्या वर घरी केले जातात. या वेळी पहिल्यांदाच मी नवीन घेतलेल्या माझ्या मायक्रोवेव्ह मध्ये बेसन लाडू केले आणि खूपच छान झाले. माझे काम खूपच सोपे झाले. म्हणून ही रेसिपी आज शेअर करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
मायक्रोवेव्ह सेफ भांडे घेऊन त्यात तूप घालून ते ३०-४० सेकंद मायक्रोवेव्ह मध्ये गरम करा. मग त्यात लाडू बेसन पीठ घालून मिक्स करा आणि २ मिनिटे गरम करा.
- 2
मिक्स करुन २ मिनिटे गरम करा मग त्यात दूध घालून परत 2 मिनिटे गरम करा. तुम्हाला हवा तसा ब्राऊन रंग येईपर्यंत गरम करा... साधारण 6-7 मिनिटे लागतील (मायक्रोवेव्ह प्रमाणे वेळ बदलेल, एका वेळी गरम करू नका २-२ मिनिटांनी काढून, मिक्स करून परत भाजा) त्यात काजू बदाम तुकडे, वेलची पावडर घालुन मिक्स करा.
- 3
आता हे मिश्रण पूर्ण थंड झाले की त्यात पिठीसाखर घालून, मिक्स करून हव्या त्या आकाराचे लाडू वळून घ्या. केवळ ६-७ मिनिटे भाजुन चविष्ट बेसन लाडू तयार तेही कमी तुपात...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
लाडू हा पदार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात केला जातो.दिवाळी असो लग्न समारंभ असो प्रत्येक वेळी लाडू हमखास केले जातात.लाडू चे विविध प्रकार आहेत,बेसन लाडू,रवालाडू,खोबर लाडू,ड्राय फ्रूट लाडू,पिठी लाडू,हे व असे विविध प्रकारचे लाडू केल्या जातात.तर आज आपण बेसन लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. MaithilI Mahajan Jain -
बेसनाचे लाडू, गव्हाचे लाडू, कोका पावडर लाडू (ladoo recipe in marathi)
#लाडूआज सहज मनात आले कि लाडू बनवू पण वेगवेगळ्या प्रकारचे. Google search करून cocoa पावडर लाडू आणि गव्हाचे पिठाचे लाडू ही रेसिपी मी केली. बेसन लाडू रेसिपी मला ठाऊक होती. Pranjal Kotkar -
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
# दिवाळी फराळदिवाळी म्हटले की गोड पदार्थांची रेलचेल असते. त्यात लाडू हवेच. त्यात बेसन लाडू हे प्रथम क्रमांकावर असतात. दिवाळी फराळातील असे हे बेसन लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसन लाडू अगदी सर्वाना आवडणारा गोड पदार्थ 😋😋माझ्या घरी तर नेहमीच डब्बामधे हा लाडु असतोच.😋😜 Archana Ingale -
रवा बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#रवा बेसन लाडूहे लाडू मुरायला 3 ते 4 दिवस जातात. पाकातले लाडू करतो त्या प्रमाणे चव लागते. Sampada Shrungarpure -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#लाडूमाझा आवडता लाडू म्हणजे बेसन लाडू. भरपूर तूप आणि गोड. घरच्या साजूक तूप घालून केले की आणखी चविष्ट. Supriya Devkar -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 4#बेसन लाडू#आमच्या कडे लक्ष्मीपूजन मध्ये जेवणाच्या नैवेद्या बरोबर दिवाळीचे पाच पदार्थ ठेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे गोड म्हणून बेसन लाडू करत आहे. माझ्या मुलाला बेसन लाडू खूप आवडतो. rucha dachewar -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#बेसन लाडूतोंडात ठेवताच विरघळून जाणारे हे खमंग पौष्टिक लाडू.लाडू करताना तूप कमी किंवा जास्त आवश्यकतेनुसार करू शकता.बेसन पीठ जर कमी भाजले गेले तर लाडू खातांना तोंडात चिकटात, आणि खूप जास्त भाजले गेले तर करपट लागतात.त्यामुळे सिम/मंद गॅस वर भाजावे. तितकेच रुचकर आणि खमंग लागतात. Sampada Shrungarpure -
-
-
बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#GSRआज गणपती बाप्पा साठी व येणाऱ्या पाहुण्यांसाठी बेसन लाडू केलेत अतिशय सुंदर झाले Charusheela Prabhu -
स्वादिष्ट आणि रवाळ बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#KS.. kids special recipe..बाल दिनाच्या निमित्ताने छोट्या मुलांसाठी पदार्थ बनवायचेय. खरं म्हणजे... पण या दिवाळीच्या वेळी मी बेसन लाडू बनवले आणि माझ्या नातवाने ते आवडीने खाल्ले, न म्हणता संपविले 😀 तेव्हा त्याच्यासाठी पुन्हा तेच लाडू बनवायला आवडेल मला . त्याचीच रेसिपी देते आहे मी खाली ...अगदी रवाळ, चविष्ट आणि टाळूला न चिकटणारे असे बेसन लाडू.. Varsha Ingole Bele -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र -2बेसन लाडू शिवाय होतच नाही. ह्या बेसन लाडवाच्या अनेक आठवणी आहेत. आईचा बेसन लाडू बनवण्यात हातखंड.सर्वांना आईच्या हातचे लाडू आवडायचे मी सुद्धा तिच्या कडून हे लाडू शकले. आज आई शिवाय ही पहिली दिवाळी लाडू करताना तिनी दिलेल्या टिप्स आठवत होत्या.आणि डोळे सारखे पाण्यानी भरत होते. आज प्रकर्षाने आईची खूप आठवण आली Shama Mangale -
बेसन चे लाडू (Besan Ladoo recipe in marathi)
#बेसनम्हटले की आई च समोर असते, आई एक मैत्रीण च होती आम्हा बहिणीची, मला वाटायचे माझ्या आई इतके सुंदर लाडू कुणीच करू शकत नाही ,आणि खरेच आहे मी कितीही मन लावून केले तरी आई च्य हातची सर येतच नाही कोणत्याही पदार्थाला.माझ्या मुलांना मी बनवलेले लाडू खूप आवडले , ते पण महणतात मला की तुझ्यासारखे कोणते ही पदार्थ कुणीच बनवू शकत नाही...😂🙏🌹 Maya Bawane Damai -
बेसन चे लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर4सुंदर आणि मुलायम दाणेदार असे बेसन चे लाडू.आमच्या कडे अशा पद्धतीने केले जातात.दिवाळी फराळ मधला सगळ्यात आवडीचा पदार्थ 🙂 Shilpa Gamre Joshi -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
गुरुवारी नैवेद्य म्हणून रवा बेसन लाडू केले. घरी सगळ्यांनाच खूप आवडतात. मस्त लागतात. Preeti V. Salvi -
रवा-बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी फराळात कितीही प्रकारचे लाडू केले तरी कमीच असतात. त्यातील एक म्हणजे रवा-बेसन लाडू. मला अतिशय प्रिय असणारे हे लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीचाआनंद खुलवणारे बेसन लाडूMrs. Renuka Chandratre
-
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #cooksnap# खमंग रवा बेसन लाडू... दीप्ती पडियार हीची रवा बेसन लाडू ची रेसिपी कूक स्नॅप केली आहे मी आज.. तसे तर आपण इतर वेळेस करतोच ..पण दुसऱ्या कुण्या author ची रेसिपी बनवली की आपल्या सोबत ही त्या authorला ही आनंद होतो म्हणून हा एक प्रयत्न ..एकंदरीत लाडू खूप छान झाले आहेत... थँक्यू दीप्ती... Varsha Ingole Bele -
रवा बेसन लाडू..(Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDR.. दिवाळी म्हटली, की लाडू आलेच.. त्याशिवाय दिवाळी अपूर्णच... आज मी भाग्यश्रीच्या रेसिपी प्रमाणे केले लाडू.. छान झाले.. मिल्क पावडर मुळे खूप छान चव येते त्यांना.. Varsha Ingole Bele -
दळाचे लाडू (dalache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 2 पोस्ट -1....दळाचे लाडू हे खानदेशी लोकान कडे नेहमी केले जातात ....तरी प्रत्येक खानदेशी लोकांची पध्दत खाण्याची त्यांच्या घराण्या प्रमाणे वेगवेगळी ....मी सासर, माहेर दोन्ही कडून खानदेशी.... पण सासरी प्रत्येक वेळेस दळाचे लाडू केले जातात आणी तेच आवडतात ...समजा रव्या ,बेसनाचे लाडू बनवले ,कींवा माहेरून आले तर त्याला लपेटे म्हणतात ..😂 कारण काय तर जास्त मेहनत न लागता पटकन लपेटे बांधून मोकळे ....पण दळाचे लाडू मंद आचेवर एक-एक वस्तू भरपूर साजूक तूपात भाजा आणी नंतर थंड करून रवा पूर्ण मोडे पर्यंत वाटिने फेसतात मीश्रण हलक आणी पांढर होई पर्यंत म्हणजे मग बनणारा लाडू पेढ्या सारखा साँफ्ट आणी मूलायम होतो .....आणी माहेरी खानदेशी पण अगदि सगळ्या सणांना तांदळाची खीर कम्पलसरी असते दूसरे खूप पक्वान्न बनवले तरी थोडी भाताची तरी खीर करून वाढायची ...पण सासरी बिल्कुल सणांना चालत नाही खीर श्राद्धाला करतात म्हणून ..... Varsha Deshpande -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnap Bhagyashri lele#रवा बेसन लाडूमी आज भाग्यश्री ताई लेले यांची रवा बेसन लाडू रेसिपी केली आहे. या लाडवांची चौक खूपच छान आहे व सर्वांना आवडली. थँक्यू भाग्यश्री ताई. Rohini Deshkar -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी8 #बेसन लाडू#लाडू म्हटले बेसन लाडू शिवाय पर्याय नाही.... Varsha Ingole Bele -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#लाडू ...न येणाऱ्या ला सूध्दा जमणारा सोप्पा आणी झटपट होणार बेसन लाडू ... Varsha Deshpande -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#gprमी आज बेसन लाडू केले आहेत.मला महीती आहे तो पर्यंत स्वामी समर्थांन अणि गजानन महाराज यांना बेसन लाडू फार आवडायचे. तेच मी प्रसाद म्हणून केले आहेत. Janhavi Pingale -
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्यबेसन रव्याचे लाडू हे पटकन बनणारे आहे, नैवेद्य साठी आपण झटपट बनवू शकतो, कमी साहित्यात होणारा हा गोडाचा पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा.पाहूया बेसन रवा लाडूची पाककृती. Shilpa Wani -
रवा- बेसन लाडू (rava besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळबेसन पीठ हे लाडू करता जाडसर लागते मात्र ते जाडसर नसेल तर मग रवा बेसन लाडू हा मस्त पर्याय आहे. दोन्हीचे काॅम्बिनेशन उत्तम चव येते. चला तर मग आज बनवूयात रवा बेसन लाडू. हे लाडू टाळ्याला चिकटत नाहीत. Supriya Devkar -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #Cooksnap आज मी माझी मैत्रीण अर्चना इंगळे हिची रवा बेसन लाडू ही रेसिपी cooksnap आहे. अर्चना हे बिना पाकातले लाडू अतिशय सुरेख आणि चवीला मधुर असे झालेले आहेत. मला तर खूप आवडले शिवाय घरच्यांना ही प्रचंड आवडलेत.Thank you so much Archana for this Yummilicious recipe..😊🌹 खरंतर रवा-बेसनाचे "पाका"तले लाडू करणे हे पहिल्यापासून माझ्यासाठी फार जिकिरीचं काम होतं. कारण ह्या "पाकाचा" काही नेम नसतो. हा "पाक "कधी दगा देईल हे सांगता येत नाही म्हणून मी या "पाकातल्या" रवा बेसनाच्या लाडूच्या जास्त नादी लागत नसे. कारण एकदा अगदी हातोडीने लाडू फोडायची वेळ आली होती माझ्यावर.😂😂.. म्हणून मग चार हात दूरच ठेवले होते या लाडवांना.. आणि दुसरं कारण असं लहानपणापासून या लाडवांंबद्दल एकच प्रतिमा मी करून घेतली होती की व्यक्तीच्या बाराव्या-तेराव्या ला हेच लाडू करतात म्हणून म्हणून याला लाडवांच्या बाबतीत मी थोडी ना खुश असायचे. पण अर्चनाने पिठीसाखर घालून केलेले रवा-बेसनाचे लाडू बघितले आणि ठरवले की आता यापुढे असेच याच प्रकारे रवा-बेसनाचे लाडू करावेत.. त्या "पाकाची " माझ्या मागची कटकट गेली होती म्हणून मी मग खुश.. चला तर मग तुम्ही पण बिन "पाकातले 'रवा बेसन लाडू कसे करता येतात ते बघा.. Bhagyashree Lele -
More Recipes
टिप्पण्या (2)