तिरंगी इडली (tirangi idli recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#तिरंगा
Post 2
तिरंगा थीमसाठी मी तीन रंगांंची रवा इडली बनवली. ही डिश झटपट होते. बघुया आपण तिरंगी इडलीची रेसिपी.

तिरंगी इडली (tirangi idli recipe in marathi)

#तिरंगा
Post 2
तिरंगा थीमसाठी मी तीन रंगांंची रवा इडली बनवली. ही डिश झटपट होते. बघुया आपण तिरंगी इडलीची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

6० मिनिटे
  1. 1 कपरवा
  2. 3/4 कपदही
  3. चवीनुसारमीठ
  4. 1मोठे गाजर उकडलेले
  5. 4पालकची पाने
  6. १/२ टिस्पून बेकिंग सोडा
  7. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

6० मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम रवा, दही आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. झाकून अर्धा तास बाजूला ठेवून द्या. अर्ध्या तासाने रवा चांगला फुललेला दिसेल.

  2. 2

    आता त्या मिश्रणाचे तीन भाग करा. पालक आणि गाजराची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या. एका बाजूला इडली साठी कूकर गरम करायला ठेवा. एका रव्याच्या मिश्रणात १/२ टिस्पून बेकिंग सोडा टाकून ढवळून घ्या.

  3. 3

    हे मिश्रण एका छोट्या वाटीमध्ये ओतून घ्या आणि कूकर मध्ये १५ मिनिटांसाठी वाफवायला ठेवा. आता रव्याच्या एका मिश्रणात पालकाची पेस्ट मिक्स करा. त्यात १/२ टिस्पून बेकिंग सोडा टाकून ढवळून घ्या आणि ते पीठ वाटीत घेऊन वाफवून घ्या.

  4. 4

    आता गाजराची पेस्ट एका मिश्रणात मिक्स करा. त्यात १/२ टिस्पून बेकिंग सोडा टाकून ढवळून घ्या. त्याची इडली करून घ्या।

  5. 5

    झाल्या आपल्या तिरंगी इडल्या तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

Similar Recipes